पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५१)

नगर शहर त्यावर चाल करून आला; या जंगी मोंगली फोजेचें आधिपत्य लष्करखान या नांवाच्या सरदाराकडे असून जाधवराव व अदिलशहा या उभयतांचे सैन्य मोंगली सैन्याच्या मदतीस आलेले होतें; जाधवरावाच्या सैन्यांत स्वतः लुकजी जाधवराव उदाराम ऊर्फ उध्दवराव माहूरचा देशमूख, विश्वनाथ, अचलोजी, बहादूरजी, दादाजी, राघोजी, व जसवंतजी, असे त्याचे सात मुलगे असून शिवाय त्याच्या तैनातीतील जलाखान, खजीरखान, खरमु- ल्लाखान, सुजाखान, जहानखान, शिकंदरखान, खलेलखान, व हिसामदखान है सरदार त्याच्या बरोबर होते; व अदिलशाही सैन्यांत रुस्तुमखान, मुस्तफा- खान, कादमदखान, दिलावरखान, याकूतखान, अंबारखान, मुशेखान, फराद- खान, सर्जाखान, जोहरखान, अंकुशखान, वगैरे सरदार हजर असून घाटगे प्रमृति मराठे सरदार, व धुंडीराज प्रभृति ब्राम्हण खरदार हजर होते; व अदिलशाही सैन्याचें आधिपत्य मुल्ला महमद लारी ऊर्फ मुल्ला बाबा सरलष्कर याच्याकडे होतें. हें जंगी सैन्य अहंमदनगरच्या रोखानें चाल करून येत आहे, असें पाहून मलिकंबरनें या सैन्याशी युद्ध करण्याची तयारी केली;


पक्ष घेतल्यामुळे भोसल्यांचें व जाधवरावाचें वैर दुणावलें; व शहा व माले- कंबर या उभयतांविषयी त्याच्या मनांत विकल्प आला; त्याच सुमारास जिजा- बाईस चवथ्यान्दा किंवा पांचव्यांन्दा गर्भार राहून पुत्र झाला; त्याचे नांव, आपल्या द्वंद्व युद्धांत मृत्यु पावलेल्या चुलत भावाच्या स्मरणार्थ, शहाजीनें संभाजी हैं ठेविलें; ( शके १५४५) बारशाच्या दिवशीं खुद्द मूर्तुजा निजाम- शहा येऊन मोठ्या समारंभानें ह्या मुलाचा नामकरणविधी झाला; त्यावेळी शहाने शहाजीस बढतीखातर कांहीं जास्त जहागीरहि दिली; शहानें शहाजी- च्या केलेल्या ह्या अहेरानें व आदरानें जाधव व भोसले यांच्यामधील वैरभाव वृद्धिंगत झाला; ही बातमी अदिलशहास कळल्यावर त्यानें जाधवरावास निजा- मशाहीतून फोडिलें, व नंतर जाधवराव हा मोंगलास जाऊन मिळाला- म्हणजे ह्या हकीकतीवरून सुद्धां भोंसल्यासंबंधी व विशेषतः शहाजीसंबंधी जाधव- रावाच्या हाडींमासी खेळत असलेल्या द्वेषामुळे व वैरामुळेच तो मोंगलास जाऊन मिळाला असेंच निदर्शनास येतें.