पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५०)

 अशा रीतीनें अदिलशहा व लुकजी जाधवराव हे आपल्या पक्षांत ओढून घेतल्यावर आतां निजामशाही आपणास सहज पालथी घालतां येईल असें शहाजहान यांस वाटू लागलें, व तो निजामशाहाची राजधानी जे अहंमद-


हान हा निजामशाहीवर स्वारी करून येणार आहे, हां हकीकत मूर्तुजा निजा- मशहा यांस कळतांच त्याच्याशी सामना करण्याची तयारी फर्माविण्याच्या इच्छेनें मूर्तिजानें व मलिकंबर यानें रियासतीतील प्रमुख प्रमुख सरदारांस सदरेस बोलावून एक मोठा दरबार भरविला. त्या दरबाराला लुकजी जाधवराव, शहाजो, शरीफजी व विठोजी राजाचे आठही मुलगे, जाधवरावाचा मुलगा दत्ताजी, खंडागळे वगैरे सरदार मंडळी हजर राहिली होती; भोंसले व जाधव मंडळी यांच्यांत कित्येक वर्षांपासून वितुष्ट असून ते जगजाहीर होते; दरबार खलास झाल्यावर सर्व सरदार मंडळी आपापल्या लवाजम्यानिशीं परत जाऊं लागली; त्या दाटणीत भोंसले पक्षाच्या खंडागळे यांचा इत्ती बेफाम होऊन त्यानें जाधवाकडाल कित्येक पाईक चिरडले; तेव्हां लुकजी जाधवरावाचा मुलगा दत्ताजी यानें संतापून तो इत्ती ठार मारला; हे पाहून खंडागळे व जाधव यांच्यांत झटापट सुरू झाली; भोसल्यांनी खंडागळ्याची बाजू उचलली; विठोजीचे आठी मुलगे त्याच्या मदतीस धांवून आले; " तुम्हास मध्ये लुड- वूड करण्याचे कारण नाहीं, " म्हणून दत्ताजी ओरडला, व त्यानें त्वेषानें भोसल्याकडील पुष्कळ लोकांस जखमी केले; त्या दंगलींत विठोजीचा वडील मुलगा संभाजी याच्या हातून दत्ताजी जाधवराव ठार झाला ! ही बातमी ऐकून लुकजी जाधवराव तात्काळ त्या ठिकाणी आला, व त्याने संभाजी भोंसल्या- वर चाल करून त्यास तात्काळ जागच्याजाग ठार केलें; लुकजी जाधवराव संभाजीवर चाल करून जात आहे, हे पाहिल्याबरोबर जाधवरावाचा जांवई शहाजी हा संभाजीच्या मदतीस घांवला; तेव्हां त्यासही लुकजी जाधवरावानें पट्टयाचा वार करून मूच्छित केले; मूर्तुज्जा निजामशहा, हा शहाजीवर पुत्रा- प्रमाणे प्रेम करीत असे; त्याला ही हकीकत समजल्याबरोबर तो तावडतोब त्या ठिकाणी आला; लुकजी जाधवरावास दोष देऊन व त्यास चार शहाण- पणाच्या गोष्टी सांगून ही मारामारी थांबविली; परंतु मूर्तुजाशहानें शहाजाच