पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४२)

नाहींत; तेव्हा येथील आर्यानार्य स्त्रियांच्या पोटून त्यांना जी संतती झाली ती ते लेकवळे, किंवा युरोपियन मानतात त्या प्रमाणे हाफक्यास्ट मानीत नाहीत; फुलक्यास्टच मानतात. लेगवळा हा शब्द येथे मिश्रविवाहोत्पन्न संतती एवढ्याच दृष्टीनें योजिला आहे. हे लोक येथें स्थाइक होऊन कित्येक पिढ्या झालेल्या होत्या, व त्यांना दक्षिणी किंवा दख्खमी असें नामाभिधान पडलें होतें. इराण, तुराण, अरबस्तान, इकडून जे नवीन मुसलमान येत त्यांना पर देशी ही संज्ञा असे. ह्या दक्षिणी व परदेशी मुसलमानांतून निजामशाही व अदिलशाही राज्यांत मुत्सद्द व लष्करी अंमलदार मिळत; आणि त्यांच्याच कर्तबगारीवर राज्याची स्थिरस्थावरता अवलंबून असे. निजामशाही व आदिल- शाही रियासतीच्या प्रारंभीच्या पन्नास शंभर वर्षांत दक्षिणी परदेशी असा भेद मुसलमानांत उद्भवला नव्हता; सर्वच मुसलमान परदेशी होते; पुढे जी घराणी ह्या देशांत पिढ्यान पिढया कायम होऊन राहिली, त्यांना दख्खनी किंवा दक्षिणी अशी संज्ञा पडली; ह्या दक्षिणी मुसलमानांचे येथे कायमचे हितसंबंध निर्माण झाले आणि त्यांच्या हितसंबंधाची व पातशाही हितसंबंधाची तेढ पडूं लागली; या तेढांला तोड म्हणून पातशाहा परदेशी नवीन मुसलमानांना आपल्या दरबारों सदा बोलावीत; कारण नवन परदेश्यांत हितसंबंध उवद्धले नसल्यामुळे पातशाही हितसंबं धांशी परदेशी कायमचे दक्षिणी बनत तोपर्यंत कांहीं काल त्यांच्यात तेढीही ही उद्भवत नसत. दक्षिणी व परदेशी असे हे दोन पक्ष एकमेकांविरुद्ध चालवून शाहा आपल्या हातांखालील अंमलदारांना दाबांत ठेवण्याचा प्रयत्न करीत. मनुष्यांना वागविण्याची नाजुक करामत ज्या सुलतानाला साधे त्याच्या हातीं हा प्रयत्न फलप्रद होई; परंतु एखादा सुलतान कमअक्कल किंवा दुर्बल किंवा पोरसवदा निपजला म्हणजे हे दोन्ही पक्ष उरमट होऊन सुलतानाच्या कह्यांत न वागतां त्याच्यावरच कुरघोडी करीत. अशा काली एकच तोड शिल्लक राही; ती ही की नवीन तिसरा एक पक्ष उभा करून, पूर्वीच्या दोन पक्षांना दाबत ठेवावयाचें शहाजी जेव्हां वडिलाच्या जहागिरीचा मालक होऊन निजामशाही दरबारांत शक १५४३ त वावरूं लागला त्यावेळी त्या दरबारांत हें दक्षिणी व परदेशी बंड ऐन