पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४१)

करितां, स्वधर्माकरितां, स्वराज्याकरितां हिंदुपक्षाच्या वतीनेंच तेवढा लढेन असें स्पृहणीय पक्षपातित्व शूद्र वर्गात अद्याप जन्मले नव्हते. त्यामुळे स्वतंत्र राज्याच्या उभारणीला मनुष्यबलाचा जो आत्मयशपूर्वक निःस्वार्थी पाठिंबा लागतो तो ब्राह्मणक्षत्रियांना नव्हता. ब्राह्मणक्षत्रियांना शूद्रांचें निःस्वार्थी मनुष्यबल नव्हतें, इतकेंच नव्हे तर स्वार्थी किंवा द्रव्यार्थी मनुष्यबलहि पैदा करण्याचें सामर्थ्य तत्कालीन ब्राह्मणक्षत्रियापार्शी नव्हतें. ब्राह्मण तर बोलून चालून जातीचाच दरिद्रो; तो द्रश्य देऊन मनुष्यबल कसच्चा पैदा करणार १ मराठ्यांचीहि मुसलमानी अमलाच्या प्रथम प्रहरांत तीच दुर्दशा होती. दहा पांच हजार पाईक पोशील, किंवा चार पांच हजार बारगीर बाळगल अशा तोलाचा मराठा क्षत्रिय शक तेराशेंपासून शक पंघराशेपर्यंत एकही नव्हता; म्हणजे ब्राह्मण क्षत्रियापाशी त्या काली मनुष्यबलहि नव्हतें, व द्रव्यबलहि नव्हतें. राहिलें ज्ञानबल, ते त्या काली निवृत्तीच्या पाठीमागे लागले होतें. निवृत्तीच्या नदीवर गोव्याघ्र व हिंदुमुसलमान यांना सारखीच तृषा भागवितां येत असे; तात्पर्य स्वार्थी किंवा निःस्वार्थी मनुष्यबल, द्रव्यबल व ज्ञानबल या तिन्ही बलांचा अभाव ब्राह्मणक्षत्रियांच्या ठायीं त्या कार्ली उत्कटत्वाने जाणवत असून, ते स्वतःच करूं नये ती यवनाची सेवा पोटाची खांच भरण्याकरितां पतकरीत असत. असल्या हतभाग्यांना कोठला स्वधर्म, व कोठले स्वराज्य ! इतकीं तीनशे वर्षे ते जिवंत राहिले हेच नशीब ! "

 "तत्कालीन हिंदूंची व रानटी अनार्यांची परीक्षा झाल्यावर, आतां मुसल मानांची परिक्षा करूं. त्या काल महाराष्ट्रांत तीन प्रकारचे मुसलमान असत. इराण, तुराण, अरबस्तान व अफगाणिस्तान यांतून येणाऱ्या मुसलमानांना अस्सल समजत; हा मुसलमानांचा पहिला वर्ग; ह्या अस्सलापासून शूद्राति- शूद्र स्त्रियांच्या ठायीं झालेल्या लेकवळ्या मुसलमानांचा दुसरा वर्ग; आणि येथीलच खाटीक, इलालखोर, तांबोळी, पटवेगार, मोमीन, रंगरेज, लोहार, बोहरी, इत्यादि वाटलेल्या जातींचा तिसरा वर्ग; वतनें राखण्याकरितां कित्येक ब्राम्हण व मराठे जे बाटले तेहि या तिस-या वर्गातच पडतात; पैकीं या तिसऱ्या वर्गातील लोकांचा पेशा उदम्यापैकों असल्यामुळे राजकीय विचारांत त्यांची गणती करण्याची जरूर नाहीं. मुसलमानी रिवाजांत मूळच्या जाती