पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४३ )

केलेले आहेत त्यावरून त्याला हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय परिस्थि तीचें किती व्यापक ज्ञान झाले होतें याची योग्य कल्पना करता येते व त्यानें त्या पत्रांत दिग्दर्शित केलेल्या अनेक मननीय व महत्त्वाच्या गोष्टीं वरून त्याची असामान्य योग्यता व दूरदर्शित्व ह्रीं स्पष्टपणे निदर्शनास येतात.

 राजे सरफोजी हा तंजावरच्या गादीवर आला ( इ० सन १७९८ ), त्या वेळी तो एकवीस वर्षांचा होता. त्याचे वालपणांतील आयुष्य रे. स्वार्झ व जेरिक वगैरे विद्वान् युरोपियन लोकांच्या सहवासांत गेल्यामुळे, त्यांच्या सहवासानें, त्याच्या मनावर पाश्चात्य विद्येचा उत्तम संस्कार झाला होता; व मि. स्वार्झ यानें त्याची स्वतः च्या मुलाप्रमाणे काळजी घेऊन त्यास शिक्षण दिल्यामुळे इंग्रजी भाषा, इंग्रजी कविता व इतर अनेक विषय त्यास उत्तम प्रकारें अवगत झाले होते. त्याच्या ठिकाणी सुशीलता, विचारसंप- नता, विद्याभिरुची, वाङ्मयप्रियता, वगैरे अनेक अलौकिक सद्गुण उत्पन्न होऊन, तंजावर प्रांतांतील लोकांस त्यांच्याविषयी अतिशय आदर व प्रेमभाव वाटत होता. मि. स्वार्स व सरफोजी राजे यांच्यामधील स्नेहभाव व वात्सल्य प्रेम खरोखरीच कल्पनातीत असे होतें. सरफोजीस तो आपला धर्मपुत्र मानीत होता व सरफोजी त्याला आपला धर्मपिता समजत होता व मि. स्वाझविषयों त्याच्याठार्थी कल्पनातित प्रेम, भक्ति व पूज्यबुद्धि वसत होती व मि, स्वार्झ- नेही त्याच्या कल्याणाकरतां, व त्याला तंजावरच्या गादांचा अघिपति कर ण्याकरितां अविश्रांत परिश्रम घेतले होते. आपण तंजावरच्या गादीवर स्थापन झाल्याचें भि. स्वार्झ यानें पहावें, अजा सरफोजीची इच्छा असणे स्वाभाविक होतें आणि ज्या दुर्दैवी व पोरक्या राजपुलास आपण आपला धर्मपुत्र मानून त्यास राज्यारूढ करण्याकरतां अत्यंत परिश्रम घेतले, त्या सरफौजीचा राज्या- रोहणसमारंभ आपण स्वनेत्रांनी अवलोकन करावा, अशी मि. स्वार्झ याची ही इच्छा असणे स्वाभाविक होते. परंतु विधिघटना अगदीच निराळी होती. सरफोजी हा तंजावर येथे सिंहासनारूढ होण्याच्या आधीच मि. स्वार्झ याच्या इहलोकांच्या जीवनयात्रेचा शेवट झाला. सरफोजानें मि. स्वार्स याच्या मृत्युपूर्वी त्याची भेट घेतली आणि त्याच्या अंत्यविधीस शेवटपर्यंत हजर राहिला. " मि. स्वार्झ यांचे, ता. १४ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर