पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४४)

अजमार्से पांच वाजतां, माजी तुळाजी महाराज यानें त्याला दिलेल्या बागेत त्याच्या घराजवळ असलेल्या किल्लयाबाहेरील त्यानेंच बांधिलेल्या लहानशा प्रार्थना मंदिरामध्ये दफन करण्यांत आले. हा अंत्ययात्रेचा देखावा अतीशय गंभीर व हृदयद्रावक होता. मि. स्वार्झ याचें कलेवर पुन्हां एक स्वनेत्रांनी शेवटचे अवलोकन करावे, अशी सरफोजी राजे यानें आपलों इच्छा दर्शविल्यावरून स्मशानयात्रेस ठरलेल्या वेळेहून थोडासा अधिक उशीर झाला. मि. स्वार्झ ह्या आपव्या उत्तम स्नेह्याच्या वियोगानें सरफोजीस जें दुःख झालें तें अंतःकरणाला अतीशयच हालवून सोडणारें होतें. त्यानें मि स्वार्झ याच्या शवावर सारखा अश्रुलोट केला, आणि त्यावर एक भरजरीची चादर घातली. " सरफोजी राजे यानें तंजावर येथे मि. स्वार्झ याचे एक स्मारक बांधले असून तेथें त्याच्या मृत्यूचा देखावा दाखविगारा एक संगमरवरी पुतळा उभारिला आहे. त्यांत सरफोजी हा, आपल्या या पूज्य व माननीय गुरूचा शेवटचा उपदेश ग्रहण करत आहे, असे चित्र काढलेले आहे. सरफोजी राजे हे स्वतः उत्तम इंग्रजी कविता करीत असून त्यानेच स्वतः त्याखाली एक इंग्रजी कविता लिहून, मि. स्वार्झ याच्या ठार्थी वसत असलेल्या अनेक असाधारण व अलौकिक सद्गुणांचे त्यांत वर्णन केलेले आहे. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे तुळाजी राजे, हा तंजावरचा मराठा राज्यकर्ता व रे. स्वात् द्दा डेनिश मिशनरी, जात निराळी, धर्म


  • ते वर्णन खालीं लिहिल्याप्रमाणेः -

"Firm wast thou, humble and wise,
Honest, pure, free from disguise,
Father of orphans, the widow's support,
Comfort in sorrow of every sort,
To the benighted, dispenser of light,
Doing and pointing to, that which is right,
Blessing to princes, to people, to me,
May I, my father, be worthy of thee I
Wisheth and prayeth thy Sarafojee"