पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४२ )

आहे, ही गोष्ट खरी आहे; परंतु म हा जो अल्पसा प्रयत्न केला आहे, स्यापासून आतांपर्यंत अतिशय फायदा होऊन गेलेला आहे, असे म्हणणे मात्र चुकांचे होईल. कोणत्याही जनसमाजाचें शील व वागणूक हीं आवश्यतःच, कहाँ प्रमाणांत परिस्थितीप्रमाणेच बदलत जातात; आणि जरी त्या परिस्थिती- चा परिणाम खात्रीनें होतो, तरी तो होण्यास कमीअधिक कालावधी लागतो. हिंदुस्थान देशाच्या हल्लीच्या परिस्थितीत, निव्वळ ज्ञानार्जन करणे, निरुप- योगो असल्यामुळे आपला चरितार्थ उत्तम प्रकारें चालेल, अशी आशा ज्या- मध्ये नाहीं, अशा एखाद्या विविक्षित उद्योगाकडे, किंवा विषयाकडे लक्ष देतां येणे अथवा त्यांत शहाणपण मिळविता येणे, कोणाची कांहीही आवड असलो तरी फारच थोड्या लोकांना ते शक्य आहे. परंतु ब्रिटिश राष्ट्राला, यापूर्वीच अनुभवानें पूर्णपणे कळून चुकले असेल की त्यांच्या आशियांतील प्रजेला आपले स्वतःचे हित स्वाभाविकरित्याच स्पष्टवणे कळते; व तें साध- ण्यांत ते सावध व चिकाटीनें काम करणारे असतात, म्हणून त्यांनी (ब्रिटिश लोकांनी ) त्या आपल्या प्रजेमध्यें ज्यामुळे त्यांना मानाची व फायद्याची नौकरी मिळू शकेल त्यांची चालू ऐहिक स्थिति अधिक सुधारेल आणि त्यांचे विचार प्रगल्भ होतील अशा प्रकारपया बुद्धिमत्तेची जोपासना मोठ्या खुबीनें केली पाहिजे आणि भावी पुष्कळ काळपर्यंत, हे दोन्हीही हेतू बरोबरच आपणांपुढे अवश्यमेव ठेवून त्यांना चाललें पाहिजे. परंतु आपल्या प्रजेच्या सुखाची व भरभराटीची काळजी असलेले असें उदार आणि सुधारलेले ब्रिटिश सरकार हे त्या प्रजेच्या स्तुत्य महत्वाकांक्षा आणि माननीय प्रयत्न यांना उत्तेजन देणाण्या गोष्टोंमध्ये मार्गे राहणार नाहीं असें माझें ठाम मत आहे आणि लोकांची नैतिक व राजकीय सुधारणा, उपयुक्त बुद्धिवैभवाची आणि सद्गुगांची वृद्धी व त्यांची वाङ्मयविषयक, शास्त्रीय व कलाविषयक प्रगति यांना ( ब्रिटिशसरकाराकडून ) ज्या प्रमाणांत उत्तेजन मिळेल, व त्यांचे भवितव्य परमेश्वरानें ज्यांच्या हाती दिले आहे ते राज्यकर्ते ( ब्रिटिश सरकार ) त्यांच्य वर ज्या प्रमाणांत विश्वास टाकतील त्या प्रमाणांत होईल, असे आढळून येईल अशी मला आशा आहे. " सरफोजी राजे यानें हे आपले विचार इ० सन १८२८ मध्ये म्हणजे ९६ वर्षांपूर्वी दिग्दर्शित