पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४१ )

अनेक देणग्या दिल्या. गणपति, सुब्रम्हण्य इत्यादि देवालयें बांधिली. अनेक जुन्या देवालयांचा जीर्णोध्दार केला. अनेक अन्नछत्रे घालून, तेथें विद्यार्थि व गरीब लोक यांना पात्रता पाहून अन्नदान देण्याची तजवीज केली, आणि आपली प्रिय राणी मुक्तंबाबाईसाहेब हिच्या नांवानें एक अन्नछत स्थापन केले. त्यास “ मुक्तंबापुरम् छत्रम् ” असे नांव असून, तें तंजावरपासून चौदा मैलांवर, आजतागायत चालू आहे.

 सरफोजो राजे यांस ब्रिटिश सरकाराकडून "हिज हायनेस" (HisHigh- ness ) दा किताब, व एकवांस तोफांच्या सलामीचा मान मिळालेला होता. शिवाय त्याची विद्वत्ता, संशोधनबुद्धि, ग्रंथसंग्रह वगैरेंबद्दलची कीर्ति इंग्लं डमध्ये होऊन, लंडन येथील "रॉयल एशियाटिक सोसायटा"ने त्यास आपल्या संस्थेचा "माननीय सभासद" ["ऑनररी मॅबर"] नेमिलें. [ इ. सन १६२८] आणि या बहुमानाची सनद, व ॲडमिरल लॉर्ड नेल्सन याचा एक पुतळा, ह्या दोन वस्तु त्यास तंजावर थेथील ब्रिटिश रेसिडेंटमार्फत नजर पाठविल्या. त्यांचा सरफोजानें अत्यंत आदरपूर्वक स्वीकार केला व त्या सोसायटीच्या अध्यक्षास मोठ्या गौरवाचें पत्र पाठवून त्यांचा अतिशय आभार- पूर्वक स्वांकार केल्याचे कळविले आहे. त्यांस पाठविलेल्या इंग्रजी पत्रांत आपल्या संस्थेने माझा हा जो सन्मान केला, त्याला मी पात्र आहे, असे मला वाटत नाही." असा प्रस्ताव करून, त्यांत या संस्थेच्या प्रयत्नानें युरोपियन व एशियाटिक यांच्यामधील परिचय अधिक वृद्धिंगत होईल आणि या संस्थेच्या सुप्रसिद्ध व सुशिक्षित संस्थापकांनी ज्या हेतूनें ही संस्था स्थापन केला, त्या हेतूप्रमार्णे, इतरही अनेक लाभ व फायदे होतील, असा मला भरवसा वाटतो " असा शेवर्टी उल्लेख केला आहे. शिवाय पत्रामध्येच त्याने आपले कांहों महत्वाचें व मननीय विचार ग्रथित केले आहेत. तो म्हणतो: – " मीं मोफत शाळा स्थापन करून, आणि माझ्या अटोक्यांत असलेल्या इतर सर्व साधनांनी माझ्या लोकांमध्ये उपयुक्त शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार करण्यांत आणि ज्या कला व जी शास्त्रें, यामुळे त्याचा ऐहिक फायदा होईल, अथवा नीतिमत्ता सुधारेल, असे मला वाटलें, ते सर्व प्रयत्न करण्यांत, मी आजपर्यंत नेहमीच अतिशय आनंद मानीत आलो