पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (३४०)

मनांत विशेष आदरभाव वसत होता, त्यामुळे त्याने ज्या ठिकाणी बहुतेक वस्ती ख्रिश्चन लोकांचीच आहे, अशा नजांकच्या कुनांडिगुडी या खेडेगांवांत पन्नास मुलांचे शिक्षण आणि पालनपोषण करण्याकरितां त्यानें एक धर्मादाय संस्था स्थापन केली आहे; शिवाय या उदार संस्थेत तीस गरीब ख्रिश्चन' लोकांचे पालनपोषण करून त्यांना कपडालत्ता पुरविण्यांत येत आहे, आणि तंजावरच्या किल्लयाजवळील धर्मशाळा अथवा सराई ( Choultry ) मध्यें, मिशन मधीलच पन्नास गरीब, पांगळे, आंधळे, आणि इतर दानधर्म करण्यास योग्य, अशा लोकांचे सर्वस्वी त्याच्याच उदार आश्रयामुळे पालनपोष होत आहे. त्याप्रमाणेच त्यानें आपल्या मुलकी व लष्करी नौकरांना, त्यांच्या अधिकाव्यांनी रविवार व इतर सणांच्या दिवशी, प्रार्थनेला हजर राहण्या- करितो, रजा देत जावां व अशा वेळी त्यांना नोकरीच्या सर्व कामांतून मोकळे करीत जावें असे हुकूम दिले आहेत. " थोडक्यांत म्हणजे, त्यानें हिंदु मुसलमान व ख्रिश्चन वगैरे सर्व जातीस समबुद्धीनें वागवून त्यांच्या करीतां अनेक पाठशाळा, व विद्यालये स्थापन केली होतीं. जशा रीतीने शिक्षणप्रसारार्थ व लोकहितार्थ सरफोजी राजे यानें अनेक प्रयत्न केल्यामुळे, आणि त्याचा अपूर्व ग्रंथसंग्रह व त्याचें बहुविधविषयांचें उत्कृष्ट ज्ञान या मुळे – त्याची कीर्ति दूरवर पसरून मोठमोठे नामांकित एतद्देशीय व पाश्चात्य विद्वान् लोक त्याच्या भेटीसाठी तंजावर येथे जात असत; बिशप हेबर वगैरे पाश्चात्य विद्वानांनी सरफोजी राजाच्या भेटीची आपआपल्या चरित्र ग्रंथांत मोठीं मनोवेधक व उत्कृष्ठ वर्णने दिलेली आहेत, व ती वाचून कोणा- च्याही मनांत सरफोजी राजाविषयों आदरबुद्धि उत्पन्न होईल, हे उघड आहे.
 सरफोजी राजे हा मोठ्या धार्मिक प्रवृतीचा राजपुरूष असून त्यानें अनेक तीर्थयात्रा व धार्मिक कृत्ये केलीं. तो स्वतः आपली सर्व घर्मकत्यें वेदोत्त रीतीने करीत असे. त्यानें काशीयात्रा व गयावर्जन केले, व तंजावर येथे परत आल्यावर, काशीकर क्षेत्रस्थ ब्राम्हणांनी शास्त्रार्थ सांगितल्याप्रमाणे रुप्याचें ब्रम्हांड खर्पर करून, त्यांत बसून, शास्त्रसंस्कार करून घेऊन, ब्राम्हणाची कन्या द्रव्य देऊन घेतला, आणि ती कन्या एका विद्वान ब्राम्हणास आपण स्वतः कन्यादान करून अर्पण केली. तंजावर तेथील बृहदीश्वराचे देवालयास