पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३२ )

-संबंधों पुन्दा कलकत्तेकरांशीं पत्रव्यवहार केला व कलकत्तेकरांस लिहिलेल्या पत्राची नकल नाना फडणवीस यांजकडे पाठवून, त्यांच्यामार्फत महादजीं शिंदे यांच्याकडे संघान लाविलें, व कलकत्तेकराकडून आणखी कांहीं सवलती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु अमरसिंहाच्या या प्रयत्नास यश न येतां, इ० सन १७९२ चाच तह कायम राहिला.

 अमरसिंह गादीवर आला त्या वेळी तुळाजीराजे याचा दत्तक मुलगा सर- फोजी हा नऊ वर्षांचा होता व त्यास मद्राससरकारानें अमरसिंहराजे यांच्या संरक्षणाखाली ठेविलें होतें; परंतु त्यानें, तुळाजीराजे यांच्या राण्या व सरफोजी यांना चांगल्या प्रकारें वागविलें नाहीं, त्यामुळे तंजावरच्या राजघरा ण्यांत पुन्हा गृहकलह सुरू झाला. तुळाजीराजे यांनों, कालवश होण्यापूर्वी, आपला अज्ञान दत्तक मुलगा सरफोजी याचा हात मि. स्वार्झ याच्या हातांत देऊन त्यास या मुलाचें पालन करण्यास सांगितलें होतें, आणि त्या मृत राजाच्या शेवटच्या इच्छेस मान देऊन मि. स्वार्झ यानें ती जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती. मि. स्वार्झ व सरफोजी यांचा संबंध प्रेमळ गुरुशिष्य या नात्याचा होता. मि. स्वार्झ हा एक मोठा सन्मान्य मिशनरी असून, त्याची दानत, त्याची विद्वता, त्याची परोपकारबुद्धि आणि त्याची सत्य- प्रियता वगैरे त्याच्या प्रशंसनीय गुणांमुळे त्याचें वजन व योग्यता त्या वेळी कंपनी- सरकारांत व एतद्देशीय लोकांत विशेषच वृद्धिंगत झालेली होती. माजी तुळा जीराजे यांची त्याच्या ठिकाणी अतिशय पूज्यभक्ति होती. त्याने मि, स्वार्झ यांस राहण्याकरितां आपला एक बाग दिलेला होता. सरफोजीवर त्याचे पुत्रा- प्रमाणे प्रेम होते व सरफोजीसही त्यांचाच पूर्ण आधार असून मि. स्वार्झ बद्दल त्याच्या मनांत अतिशय पूज्यबुद्धि वसत होती. अर्थात् तुळाजीच्या मृत्यूनंतर सरफोजीच्या सुखदुःखाची, नफा नुकसानीची,कल्याणअकल्या- णाची सर्व जबाबदारी मि. स्वार्झ यांच्यावरच येऊन पडली होती. त्यामुळे,त्यानें इ. सन १७९३ मध्यें" सरफोजीस व त्याच्या मातोश्रीस अमरसिंहराजे चांगल्या प्रकारें वागवीत नाहींत. " अशी मद्राससरकारांकडे तक्रार केली; तेव्हां त्यांनी त्या उभयतांना - मद्रास येथे नेऊन ठेविलें, ब तेथें रे. जेरिक, या नांवाच्या एका पाद्रो गृह-