पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३३१ )

इ० सन १७८७ च्या तहांतील जबर खंडणी व इतर कडक अटी कमी करून घेण्याचा अमरसिंहाने भगीरथ प्रयत्न केला व अखेरीस नाना फडणीस, महादजी शिंदे, वगैरे मुत्सद्दयांकडून शिफारशी व खटपटी करवून त्यानें इ० सन १७८७ चा तह अखेर रद्द करविला आणि ता. ११ जून इ० सन १७९२ रोजी, इंग्रजांनी अमरसिंहाबरोबर नवीन तह केलास या तहति मद्रा- सचा गव्हर्नर सर चार्ट्स ओकले, थानें, “ इ० सन १७८७ च्या तहाप्रमाणे खंडणीचा, व इतर पैसा देण्याची तंजावर संस्थानास ऐपत नसून, त्वा संस्था- नावर लादलेल्या मागण्या फारच जबर आहेत; " असें कबूल केले. आणि " सबब या नवीन तद्दाप्रमाणे खंडणांच्या रकमेत फेरफार करावा " असें ठरविलें. तो फेरफार खाली सिहल्या प्रमाणेः—

 [१] पहिली तीन वर्षेपर्यंत, शांततेच्या काळातील खंडणी, " साडे तीन लक्ष होन” ( १२,२५,००० रुपये ) प्रमाणे तंजावरच्या राजानें इंग्रजांस द्यावी.
 [२] पेषकशीच्या मागील बाकीबद्दल पन्नास हजार होन, [१७५०००. रुपये] द्यावेत, आणि खाजगी खर्चाबद्दल साठ हजार होन [२,१०,००० रुपये] द्यावेत; म्हणजे पूर्वीच्या तहाप्रमाणे जेथे २४,५०, २१२ रुपये ही देण्याची रक्कम ठरली होती. तेथें या तहाअन्वयें यापुढे १६,००,००० रुपये दरसाल तंजावरच्या राजानें इंग्रजांस द्यावे.
 [३] पहिली तीन वर्षे संपल्यावर त्यानंतर चालू पेषकशीबद्दल, तंजा- वरच्या राजानें इंप्रजोस, १,१४, २८५ होन (३९,९९९७-८-०) इंग्रजांस अधिक द्यावेत.
 [४] तंजावरच्या राजाकडून खंडणीचा ६प्ता वेळेवर दिला गेला नाही, तर कंपनीने तंजावर संस्थानाच्या चार सुभ्यांची व्यवस्था आपल्या हाती घेऊन खंडणांचा हप्ता वसूल करून घ्यावा.
 [५] माजी तुळाजीराजे यांच्या विधवा राण्यांकरितां तीन हजार होन [साडे दहा हजार रुपये] व त्याचा दत्तकपुत्र सरफोजी, याच्या खर्चासाठी अकरा हजार होन [ अडतीस हजार पांचशे रुपये ] दरसाल कंपनीस देत जावे. वरील तहानंतर, राजे अमरसिंह यानें, या तहांतही भासणा-या अडचणी-