पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(३३३ )

स्थाची, सरफोजीस शिक्षण देण्यासाठी, योजना केली. नंतर मद्रास येथूनच सरफोजीच्या आईनें भि. स्वार्झ याच्या मदतीने व पाठबळानें, " तंजावरच्या गादीवर आपला मुलगा सरफोजी याचाच इक आहे. " अशी कलकत्तेकर गव्हर्नर जनरल लॉर्ड कार्नवालीस यांस यादी पाठविली. आणि मि स्वार्झ यानें स्वतः या बाबतींत पुढाकार घेऊन, अतिशय खटपट केली त्याने राजे अमरसिंह याच्या वर्तनांतील व राज्यकारभारांतील सर्व दोषांचे आविष्करण करून; तो गादीस नालायक आहे, असें मद्रासचा गव्हर्नर सर चार्लस् ओकले याच्या पूर्णपणे निदर्शनास आणून दिले. त्यानें, “सरफोजीचे दत्तविधान सशास्त्र झालेले आहे, अमरसिंह यानें तंजावर येथील पंडितांस लांच देऊन त्यांच्या कढून विरुद्ध अभिप्राय लिहून घेतला व त्या वेळचा [इ. सन १७८७] मद्रास येथील गव्हर्नर सर आर्चिबाल्ड कॅबेल याचा गैरसमज केला. " असा पुरावा गोळा केला, आणि लॉर्ड कार्नवालीस याच्याशी या बाबतींत पत्रव्यवहार करून,या प्रकरणाची योग्य चौकशी करावी व सरफोजोस तंजावरच्या गादांचा मालक ठरवून त्यास राज्यारूढ करावें " अशी विनंति केली. याच वेळी, अमरसिंह याजकडील इंग्रजांस द्यावयाची खंडणीची बाकी थकली व त्याच्या राज्यकारभारामध्येही पुष्कळच अव्यवस्था होऊन तो बोभाटा मद्रास सरकारच्या कानावर गेला व त्यामुळे अमरसिंहाविषय त्यांचा प्रतिकूळ ग्रह झाला. इकडे मि. स्वार्झ यानें कलकत्ता सरकराकडे केलेल्या पत्रव्यवहाराचा त्या सरकारावर उत्तम परिणाम होऊन त्यानें या बाबतींत ताबडतोब चौकशी सुरू केली. सरफोजीच्या दत्तविधानाच्या शास्त्रार्थाबद्दल काशीतील व बंगालमधील विद्वान् पंडितांचे अभिप्राय मागवून आपली शहा- निशा करून घेतली. त्या काळांतील बंगालमधील सुप्रसिद्ध संस्कृतज्ञ व विद्वान् इंग्रज पंडित सर विल्यम जोन्स याची मदत घेऊन, या बाबतींतील सर्व शास्त्रार्थांचे इंग्रजीत भाषांतर करविले व या प्रकरणाचा यथायोग्य विचार करून ता. ३० डिसेंबर ३० सन १७९६ रोजीं, कलकत्तेकरांनी आपला स्वतंत्र ठराव प्रसिद्ध केला. त्यांत हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल सर जॉन शोभर यानें, " सरफोजीचें दत्त वधान सशास्त्र आहे व राजे अमरसिंह हा तंजावरच्या गादीस नालायक आहे " असे आपले मत दिले व हें प्रकरण