पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३३० )

मागील बाकी, इ० सन १७७६ पासून इ०सन १७८७ पर्यंत १२५७१४२ होन (४३९९९९७ रुपये ) निघत आहे; त्याप्रमाणे ब्रिटिश प्रजेच्या देण्याची बाकी चार लाख रुपये निघत आहे; त्याबद्दल दरसाल तीन लाख द्दोन ( १०५०००० रुपये ) नबाब व सावकार यांना देण्यांत येतील व त्याबद्दलची सर्व जबाबदारी कंपनी आपणांकडे घेईल.

 राजे अमरसिंह हा इंग्रजाबरोबर उपरीनिर्दिष्ट तह करून, तंजावरच्या गादीवर स्थापन झाला; परंतु या तहामुळे, आपले स्वातंत्र्य, आपली सत्ता, व सांपत्तिक सुस्थिति बहुतेक संपुष्टांत आली, ह्या गोष्टींची त्याला लवकरच जाणीव झाली आणि त्यानें पेशव्यांकडे आपले वकील व मुत्सद्दी पाठवून, पेशव्यांमार्फत इंग्रजांकडे मध्यस्थी करून इ० सन १७८७ च्या या तहानें तंजावर संस्थानावर बसलेल्या जबर खंडणीचा व इतर कडक अटींचा निर्बंध कमी व्हावा म्हणून प्रयत्न केला; इतक्यांत, याच वर्षी ( इ० सन १७८७) इंग्रजांचा शत्रु असलेला म्हैसूरकर टिपू सुलतान यानें कान्स्टांटि- नोपल येथील सुलतानाकडे आपला एक वकील पाठविला; त्याचे तेथील सुलतानानें मोठ्या भपक्याचें आगतस्वागत केले. याच वर्षी फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामधील संबंधांची उघड उघड भोढाताण चालली होती. याच समयास पारीस येथे तेथील राज्यकर्ता सोळावा लुई यानेंही टिपूच्या वकिलाचे सन्मानपूर्वक आदरातिथ्य केले व त्यानंतर लवकरच हिंदुस्थानांत टिपू व इंग्रज यांच्यामध्यें युद्ध सुरू झाले. तेव्हां कर्नाटक प्रांतावर, ब विशे- षतः इंग्रजांचा आश्रित दोस्त तंजावरकर अमरसिंह याच्यावर मोहीम करून ( इ० सन १७९०-९१ ) त्यास पुष्कळ उपद्रव दिला; इंग्रजांनी इ० सन १७८७ च्या तद्दाअन्वयें तंजावरच्या राजाचें परशत्रूपासून संरक्षण कर- ण्याची हमी घेतलेली होती; त्याप्रमाणे त्यांनी तंजाववरच्या राज्यावरील टिपूच्या स्वाव्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; पण त्याबरोवरच, त्या मुदतीत तंजावरच्या राज्याचा वसूलही त्यांनों आयल्या मुखत्यारीने करून घेतला. ही गोष्ट अमरसिंहास न आवडून त्याबद्दलही त्याने पेशव्यंकडे पत्र- व्यवहार केला; शिवाय कलकत्तेकरांकडेही त्याने मोठा मुद्देसूद पत्रव्यवहार करून, आपल्या म्हणण्याचे समर्थन सयुक्तिक रीतीनें केले. थोडक्यांत म्हणजे