पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२९ )

इंडिया कंपनीच्या ताब्यांत आलें. या तहांतील मुख्य कलमें खालीं लिहिल्याप्रमाणे:-
 (१)तंजावरकर व इंग्रज या उभयतांनी परस्परचि शत्रु व मित्र यांना शत्रु व मित्र समजावें.
 (२) तंजावरच्या राजानें दरसाल चार लक्ष होन, ( Star Pagodas ) म्हणजे चबदा लक्ष रुपये, तंजावरच्या संरक्षणार्थ ठेविलेल्या इंग्रजी सैन्याच्या खर्चासाठी किस्तबंदीनें देत जावे.
 (३) सदरहू चार लाख होनांचा रकम, तंजावरचा वार्षिक वसूल दहा लाख दोन [ पस्तीस लक्ष रुपये ] होईल, असें सरासरांचें प्रमाण घेऊन ठर विली आहे. तथापि वसुलाचे प्रमाण अधिक वाढले तर त्या मानानें ही खर्चाची रक्कम अधिक देत जावी.
 (४) चार लाख होनांची ठरलेली इतेबंदीची रक्कम देण्यांत, तंजावरच्या राजाकडून कसूर झाली तर कंपनीने तंजावर प्रांतांत प्रवेश करून आपल्या अधिकारानें ही रक्कम वसूल करून घ्यावी.
 (५) अशा प्रसंगी तंजावरच्या राजाचे अधिकारी व अंमलदार लोक हे कंपनीच्या इच्छेप्रमाणे वागून कंपनीचा वसूल सुरळीत करून देतीलच; परंतु त्यांत जर त्यांनी हयगय केली, तर कंपनीने त्यांना कामावरून बडतर्फ करून, त्यांच्या जागीं दुसरे लोक नेमावे.
 (६) कलम ४ व ५ प्रमाणे हसेबंदीच्या वसुलासाठी ज्या ज्या वेळीं, तंजाबरच्या राज्यांत कंपनीस आपला अधिकार चालविण्याची गरज पडेल, त्या त्या वेळी, तो अधिकार चालवितांना तंजावरच्या राजाच्या राज्यव्यवस्थेत किंवा राजकीय मानमरातबांत ढवळाढवळ केली जाणार नाही.
 (७) कर्नाटक प्रांतामध्यें, किंवा तंजावर संस्थानात किंवा कारोमांडल किनान्यावर युद्ध सुरू झाले तर त्याबद्दलची सर्व जबाबदारी कंपनीवर राहील, व युद्ध चालू असेपर्यंत कर्नाटकांतील वसुलाचा भाग कंपनी प्रतिवर्षी लष्करी खर्चाकडे देईल; व त्याप्रमाणेच तंजावरच्या राजानेही आपल्या राज्याच्या वसुलाचा भाग प्रतिवर्षी कंपनीस देत जावा.
 (८) तंजावरच्या राजाकडे कर्नाटकच्या नवाबाच्या पेषकशीबद्दलची