पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३)

वून व नांव मिळवून आपले पुष्कळच महत्व स्थापन केले होतें; इ० सन १५८८ मध्ये गोवळकोंडेकर महंमद कुली कुत्बशहाची बहीण मलिका जहान


ओळ श्री.

१ स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ५४ लवंग नाम संवत्सर मार्ग-
२ सीर्ष सुध ( शुद्ध ) चतुर्थी, इंदुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री
३ राजा संभू ( शाहू ) छत्रपति स्वामी यांणी राजश्री सुभेदारानी

श्री

राजा शंभू छत्रपती
हर्ष निदान रघुनाथ सुत
तिमाजी पंडित मुख्य

प्रधान.


+

श्री
आई आदि पुरुष श्री
राजा शिवछत्रपती स्वामी
कृपानिधी ॥ तस्य परशु-
राम त्रिंक प्रति-
निधी.


४ व कारकुनांनी व सुभे लष्कर कसि
५ लेदार यांसि आ
६ ज्ञा केली यैसीजे मौजे
कोनोसी ता! खरवडी (खरखंडी ) पा (प्रा) सेवगांव
७ सरकार अमदानगर ( अहमदनगर ) बागा व दरगा हजरत शाहा शीरफ ( शरीफ )
८ पीर मुकाम (मुक्काम) अमदानगर यांसी इनाम आहे तेणें प्रा (प्रमाणें )


 *इंग्रजी तारीख ६ नोव्हेंबर इ० सन १७२७.

 + हे शिक्के असलेले राज्याभिषेक शक ५१ चें एक आज्ञापत भा. इ. सं. मंडळानें छापविलेल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या विसाव्या खंडाच्या २७१-२७२ पृष्ठांवर प्रसिद्ध झालें आहे.

 विशेष माहितीः- वरील भोसल्यांनी दिलेल्या देणगीशिवाय राहूरी तालुक्यांतील एक लहरे हा गांवही या पौरस्थानास जहागीर आहे.