पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२)

पुष्कळ नवस, दानधर्म, व अनुष्ठानें केलीं; त्यांतच नगर येथील प्रसिद्ध पीर शहाशरीफ यांसही नवस केला; व त्यानंतर दिपाबाई गरोदर होऊन योग्य कालानंतर तिला पुत्र झाला; ( इ० सन १५९४) आपणांस पीर शहा शरीफ याच्या अनुप्रदानें हा पुतलाभ झाला, असे मानून मालोजीने त्याचें नांव शहाजी असे ठेविलें; त्यानंतर तीन वर्षांनी इ० सन १५९७ मध्ये त्यास दुसरा मुलगा झाला, त्याचेंही नांव त्या पिराच्या नांवावरूनच शरीफजी असें ठेविलें; आणि या पुत्रप्राप्तीमुळे मालोजी व दिपाबाई यांचा संसार सुखाचा होऊन ती उभयतां आनंदानें कालक्रमणा करूं लागली.

मालोजी हा मोठा धाडशी, शूर, व कर्तबगार पुरुष होता. आणि इ० सन १५८८ पर्यंत त्यानें निजामशहाच्या वतीने अनेक युद्धांत पराक्रम गाज-


 *ह्या पिरास भोसल्यांनी देणग्या दिल्या असून त्यासंबंध इतिहास संग्रहांत, ( पुस्तक ७ अंक १० ते १२ मे, जून, जुलई पहा.) एक सनद दिली आहे; ती सनद व त्यासंबंधी माहिती खाली लिहिल्याप्रमाणें:-

अहमदनगरचे पौर शहा शरफिजी
यांस दिलेली एक सनद.


( यशवंत राजाराम गुप्ते, बी. ए.)

 मालोजी भोसले यांस मूल होत नव्हतें; ( त्यामुळे ) त्याची स्त्री दिपाबाई हिनें अहमदनगरचा सुप्रसिद्ध पीर शहा शरीफ यांस नवस केला; नंतर तीस इ० सन १५९४ त मुलगा झाला, त्यास शहाजी म्हणूं लागले; ( आणि ) इ० सन १५९७ त दुखरा घुत्र झाला, त्यास शरीफजी या नावाने संबोधू लागले. आतां नवसामुळेच पुत्रसंतती झाली किंवा कसे, हा प्रश्न वेगळा; तथापि त्या पौरास भोंसल्यांनी देणग्या दिल्या, त्या अद्यापि चालत आहेत, ही गोष्ट ऐतिहासिक व धार्मिक दृष्टया महत्वाची आहे. अहमदनगर जिल्ह्यां- तील (शेवगांव तालुक्यांतील ) कोनोसी येथील जहागिरदार सय्यदमिया रहिमानमिया ( दायरेवाले ) यांचें जवळ एक अस्सल सनद आहे, तिच्या वरून श्री. पेशवे सरकारांनीही (ह्या पिराच्या ) देणग्या चालू ठेविल्या होत्या, असें दिसतें. ती सनद येणेप्रमाणे:-