पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४)

हिच्याशीं विजापूरकर इब्राहीम अदिलशहा याचे लग्न होण्याचे ठरलें; परंतु मूर्तुजा निजामशहा हा त्याच्या आड आला; या वेळी मूर्तुजाशहा हा आपल्या वजिरावर सर्व राज्यकारभार सौंपवून अवश्याच्या किल्ल्यावर ईश्वरचिंतन करीत राहिला होता; व त्या ठिकाणी मालोजी राजे भोसले यांस त्याच्या तैनातीस ठेविलें होतें. मूर्तुजा निजामशहा हा इब्राहीम अदिलशहाच्या लग्नाच्या आड गेल्यानें अदिलशहानें रागाऊन आपला सरदार दिलावरखान यांस निजामशहावर पाठविलें; व त्याप्रमाणे तो अवश्याच्या किल्ल्यावर चाल करून आला; त्या वेळीं मालोजीनें मोठया पराक्रमानें व सफाईनें त्याला हटवून निजामशहाचे संरक्षण केले. त्यामुळे मालोजीचे महत्व पुष्कळच वृद्धिंगत झाले; पुढे इ० सन १५९२ मध्ये दिलावरखान हां इब्राहीम अदिलशहाला सोडून अहमदनगर येथे येऊन निजामशहास मिळाला; व त्याच्या सल्ल्यावरून निजामशहानें मंगळवेढ्यापर्यंत अदिलशाही प्रदेश जाळून पोळून उध्वस्त


९ स्वामींनी करार केले असे, तरी कुलबाब कुल कानु देखोल ( सह )
१० सरदेशमुखी इनाम दिल्हा आहे, तरी तुम्ही मोजे मजकुरां
११ स मुजाहिम न होणें व कोण्डे विशीं यकराज उपसर्ग न
१२ देणे जाणिजे निदेश समक्ष
( उलटून)

सुरु सुदबार


रुजु सुरनवीस


मर्यादे
विराजते.



 x मंगळवेढे हा गांव दक्षिण महाराष्ट्रांतील सांगलीच्या राज्यांत, सोला- पूरच्या नैर्ऋत्येस ४२, पंढरपूरच्या दक्षिणेस १६ व सांगलांच्या ईशान्येस ६५ मैलांवर आहे.