पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९७ )

मुल्क व अर्काटकर सादत उल्लाखान यांचे विशेष प्रावस्य माजलें. अर्काटचा नबाब हा मराठ्यांना खंडणी देत असे तीही सादतउल्लाखान मृत्यु पावल्यानंतर म्हणजे ६० सन १७३२ पासून मराठ्यांना मिळेनाशी झाली. आणि इ० सन १७३६ मध्ये चंदासाहेचानें त्रिचनापल्लो एथील हिंदु राज्य खाऊन टाक. व्यापासून तर त्याच्यापासून तंजावरच्या राज्यास धोका पोचण्याची विशेषच भीति उत्पन्न झाली होती. चंदासाहेबही तंजावर खाण्याकरितां निरनिराळे मनसुबे व कारस्थानें घडवीत होता. इतक्यांत "आपला व्याही सय्यदखान याचा तंजावरकर प्रतापसिंहानें वध केला;" ही बातमी चंदासाहेबास समजली. त्याबरोबर तो खवळून एखाद्या जंगी तुफानाप्रमाणे तंजावरवर येऊन कोसळला व तंजावरच्या किल्लपास वेढा दिला. सतत दोन महिने वेढा सारखा सुरूं ठेविला, व मोठ्या अट्टाहासानें किल्ला हस्तगत करून घेण्याचा प्रयत्न आरंभिला. तेव्हां या संकटांतून मुक्त होण्याकरितां, प्रतापसिंहाने सातारकर छत्रपति शाहू व पेशवे यांना ही हकीकत कळवून त्यांची मदत मागितली. त्याप्रमाणे शाहूनें मराठ्यांची जंगी फौज कर्नाटक प्रांत पाठविण्याचे ठरवून, नागपूरकर रघोजी भोंसले, अक्कलकोटकर फत्तेसिंह भोंसले, औधरक श्रीपतराव प्रतिनिधि, वगैरे सरदारांना तिकडे पाठविले; आणि गुत्तीकर मुरारराव घोरपडे यांस तुंगभद्रे- जवळील तीन तालुके त्यास देण्याचे मान्य करून आपल्या सैन्यानिशीं त्यांना मिळविण्याविषयी कळविले. त्याप्रमाणे हे सर्व सैन्य एकत्र होऊन इ० सन १७४० च्या एप्रिल महिन्यांत, मोठ्या जोरानें अर्काट प्रांतांत येऊन धडकलें.

 इकडे अर्काटचा नबाब दोस्त अल्लखिान हाही मराठ्यांच्या सैन्याशीं सामना देण्यास पुढे सरसावला आणि कडप्पा, ऊर्फ कड्डापा व अर्काट या दोन जिल्ह्यांच्या मध्ये असलेल्या दमलचेरीच्या घाटांत, ती सुरक्षित जागा समजून, ४ हजार घोडेस्वार व ६ हजार पायदळ, आपला धाकटा मुलगा. हुसेनअल्ली व इतर अनेक नामांकित सरदार, यांसह येऊन दाखल झाला. मराठ्यांचे सैन्य घोटाच्या पलीकडे होतें. मराठ्यांनी नबाबाशीं सामदामाची बोलणीं प्रथम सुरू केली. परंतु नबाबानें ती मनावर न घेतां त्यांस उडवा- उडवींची उत्तरे दिलीं, त्यामुळे मराठ्यांनी आपले १० हजार घोडेस्वार एका जंगलातून आडमार्गाने पुढे पाठवून नबाबाच्या सैन्यास वळसा घातला व