पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९८ )

बाकी फौजेनें डोंगरावर चढून सर्व मान्यांच्या जागा हस्तगत करून घेतल्या. आणि नबाबाच्या सैन्याशीं समोर येऊन युद्ध सुरू केलें (ता. ९ मे सन १७४०). है युद्ध मोठेंच घनघोर झालें, उभयताही पक्षांनी बंदुका व तोफा उपयोगांत आणिल्या. मराठ्यांनी मोठ्या चिकाटीनें युद्ध करून आपला शौर्यप्रभाव विशेष गाजविला. आणि नबाबाच्या सैन्याचा पूर्णपणें पराभव करून त्याची दाणादाण उडविली. या युद्धांत, नबाब दोस्त अल्लीखान, त्याचा धाकटा मुलगा हुसेन- अल्ली, व अनेक नामांकित सरदार रणांगणीं पतन पावले. अर्काटचा मुख्य दिवाण मीर आसद हा मराठ्यांच्या ताब्यांत आला, व मराठ्यांना या युद्धति निर्विवाद विजय प्राप्त झाला.

 नबाब दोस्त अल्लोखान याचा वडील मुलगा सफ्तरअल्ली हा आपल्या वडीलाच्या मदतीकरितां सैन्य घेऊन दमलचेरीकडे येण्यास निघाला होता; त्यास दें दमलचेरीच्या खिडोतोल युद्धाचें भयंकर वर्तमान समजतांच तो घाबरून स्वसंरक्षणासाठी वेलोर येथे पळून जाऊन तेथील बळकट किल्लयाच्या आश्रयास राहिला; व चंदासाहेब हा त्रिचनापल्लांहून ५ हजार घोडेस्वार व १० हजार पायदळ यांसह आपल्या सासऱ्याच्या मदतीस येत होता, तो- ही युद्धाचें हें हानिकारक वर्तमान कानी पडतोच त्रिचनापल्ली येथे परत गेला. थोडक्यात सांगावयचे म्हणजे या दमलचेरीच्या युद्धांतील निर्णयात्मक विजयामुळे, मराठयांची कर्नाटकभर कीर्ति झाली, व याच विजयवार्तेने त्यांचा कर्नाटक प्रांतांत सर्वत्र पूर्ण दरारा बसला.

 अर्काटकर दोस्त अल्लीखान याच्या मृत्यूमुळे रिकाम्या झालेल्या अर्का- टच्या गादीचा खरा वारस त्याचा वडील मुलगा सफ्तर अल्लीखान हा होता. परंतु त्यास चंदासाहेब हा प्रतिस्पर्धी असून, जरी बाह्यात्कारी तो, " आपण सफदर अल्लीखानाचे हितचिंतक आहो " असे दाखवीत होता तरी-परिस्थिति अनुकूल होतोच (१) अर्काटची गादी आपण मिळवावी अशी त्याची इच्छा होती. तथापि सफदरअल्लीखान हा चंदासाहेबाचें सर्व कृत्रिम ओळखून अस. ल्यामुळे, त्याने मराठयार्शी त्यांच्या इच्छेप्रमाणे खंडणी व प्रांत देण्याचे ठर. वून तह केला ( ता. १६ नोव्हेंबर इ० सन १७४० ) ; व या तहाअन्व येच, मराठयांच्या मार्फत चंदासाहेबाची त्रिचनापल्ली येथील सत्ता नष्ट कर.