पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९६ )

आरंभिला, त्याने सय्यद खानाचा भाऊ सध्यदकासीम यास अनुकूल करून घेतलें, व त्याच्या मार्फत, सय्यदखानाचा व चंदासाहेबाचा झालेला गुप्त कट माहीत करून घेतला. इकडे सय्यद खानानें बंदासाहेबाच्या मुलास आपली मुलगी देण्याचे निश्चित करून प्रतापसिंहास लमाचे निमंत्रण दिलें, आणि असे सांगितले की, " मी माझी बेटी चंदासाहेबाच्या मुलास अर्पण करण्याचा निश्चय केला आहे. चंदासाहेब बलवान् व प्रतापी पुरुष असल्या- मुळे त्याच्याशी संबंध केल्याने तंजावरच्या गादीस बळ प्राप्त होईल. प्रतापसिंहास सय्यद खानाचे सर्व कृत्रिम पूर्ण माहीत होतें; तथापि त्यानें तर्खे यत्किचित्हि न दाखवितां वरकरणी ह्या शरीरसंबंधास आपली पसंती दर्शवून चंदासाहेबाची स्तुती केली व लग्नास लागेल तो खर्च देण्याचें मान्य केले. तथापि लग्नमात्र तंजावरच्या किल्लयांत न करता मध्यार्जुन ( हे ठिकाण तंजावर पासून २९ मेळांवर आहे. ) येथे करावे, अशी त्यास सूचना दिली. त्याप्रमाणे सय्यद खानानें चंदासाहेबाच्या मुलाबरोबर आपल्या मुलीचें लम मध्यार्जुन येथे मोठ्या थाटानें केले; आणि चंदासाहेबाशी सर्व राजकारणाचे खळगत करून तंजावरच्या किल्ल्यावर त्यानें गुप्त रीतीनें अमूक वेळी हल्ला करावा असा संकेत ठरविला, परंतु या गुप्त कारस्थानाची बातमो सय्यद खानाचा भाऊ सध्यद कासीम यानें कागदपत्रानिशीं प्रतापसिंहास कळविली. त्याबरोबर वेळीच सावध होऊन, प्रतापसिंहाने आपले मुख्य सरदार मल्हारजी गाडेराव, अनप्पा शेडगे व मानाजीराव जगताप, यांच्या सल्लथानें सैन्याचा सर्व बंदोबस्त पक्का करून सय्यदखानास आपणा- कडे राजवाड्यांत कांहीं राजकारणनिमित्त बोलाविलें व तेथेंच त्यास केद करून आपल्या सरदार मंडळींच्या ताब्यांत दिले न त्यांनी त्यास लागलींच यमसदनी पाँचविले, अशा रीतीनें सय्यदखानाचा हा प्रबळ व प्रमत्त कांय जगतून कायमचा नष्ट करून टाकल्यावर मल्हारजी गाडेराव प्रभृति सरदारांना राज्याचे मुख्य अधिकार देऊन, त्यांच्या सल्लयानें राजे प्रतापसिंह यानें राज्य- कारभार करण्यास सुरवात केली.

 या काळांत, दक्षिण हिंदुस्थानांतील मराठ्यांची सत्ता पुष्कळच कमी होऊन, कर्नाटक प्रांतांत मुसलमानी राजसत्ता संस्थापित झाली. आणि निजाम उलू-