पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९० )

हकीकतीवरून असे दिसतें कीं, सरफोजी व तुकोजी या उमयतां राज्यक- त्यांच्या कारकीर्दीत तंजावर येथील मराठथांनीं रामेश्वरच्या आसपासच्या सर्व प्रदेशभार आपली सत्ता बसविली; आणि तुकोजीच्या कारकीर्दीत, तंजावरकर मराठषांनी, शिवगंगा व रामनाथ येथील जमीनदारांना इ० सन १७३० च्या सुमारास जिंकून आपल्या नियंत्रणाखाली आणिलें, तुकोजोच्या कारकीर्दीतही तंजावरच्या राज्यास सादतउल्लाखान व निजामउलूमुल्क या उभयतांपासून उपद्रव पोंचण्याची भीति होती. आणि इंग्रज व फेच हे उभयतो कर्नाटकांत आपला प्रवेश करण्यासाठी योग्य संधि पहात होते; तथापि अशा बिकट परिस्थितीमध्येही त्याने आपले राज्य सुरक्षित ठेविलें. इतक्यांतच मध्यंतरी इ. सन १७३२ मध्ये कर्नाटकचा नवाब सादतउल्लाखान हा मृत्यु पावला; व त्याचा पुतण्या दोस्तभल्ली हा कर्नाटकचा नबाब बनला. त्या वेळी कर्नाटकांत थोडी चळवळ उत्पन्न होऊन तिचा त्रास तंजावरच्या राज्यास पाँचतो की काय, अशी भीति उत्पन्न झाली होती; परंतु तुकोजीनें मोठ्या दक्षतेनें व बंदोबस्तानें राज्यकारभार चालवून आपले संस्थान सुरक्षित ठेविलें.

 तुकोजी राजे हा सरफोजीहून अधीक हुषार, राजकारणपटू, व विद्याभि- लाषी असून त्यास संस्कृत, तामिळ, मराठी व फारशी या भाषा अवगत होत्या; व त्यामुळे दूरदूरचे विद्वान पंडित व फकीर लोक त्याच्या भेटीस येत असत, तुकोजीराजे हा इ० सन १७३५ मध्यें, देवगतीस पावला. त्यास अरणाबाई, रामकुंवरबाई, मोहिनाबाई, मैनाबाई व लक्ष्मीबाई अशा लग्नाच्या पांच स्त्रिया व अन्नपूर्णाबाई या नांवाची, कट्यारी बरोबर लग्न लाविलेली (परिगृहीत ) सहावी स्त्रो, मिळून एकंदर सदा स्त्रिया होत्या. त्यांपैकी, लग्नाच्या स्त्रियांपासून त्यास बाबासाहेब, सयाजी, अण्णासाहेब व नानासाहेब, असे चार पुत्र झाले व सहावी स्त्री अन्नपूर्णाबाई हिच्यापासून प्रतापसिंह या नावाचा एक पुत्र ( अथवा दासीपुत्र ) झाला. त्यांपैकी सर्वांत वडील मुलगा बाबासाहेब हा व्यंकोजी [ ऊर्फ एकोजी ] हे नांव धारण करून तंजावरच्या गादीचा अघिपति झाला.

 व्यंकोजी राजे हा अल्पायु निपजून त्यांची कारकीर्द अवधी एक वर्षातच समाप्त झाली. हा राजा जात्याच संशयी वृत्तीचा होता, आणि त्यांतच