पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२८९ )

होय. ही बाई स्वभावानें अतिशय गरीब व विनयशील होती. दुसरी स्त्री अपरूपबाई, हीही घाटगे घराण्यांतीलच असून ती मोठी महत्त्वाकांक्षी व सत्ता- प्रिय होती व तिसरी स्त्री राजसबाई, ही शिर्के घराण्यांतील असून ती स्वभावाने शांत, सालब व सद्गुणी होती. सरफोजीस लग्नाच्या ह्या तीन बायका होत्या. तरी त्यास पुत्रसंतति नव्हती. उलटपक्षी सरफोजीचा धाकटा माऊ तुकोजी यास बार औरस व एक परिगृहीत स्त्री पासून झालेला, असे पांच पुत्र होते. तुकोजीराजे यांस इतकी पुत्रसंतती, व आपणांस एकही पुत्रसंतान नाही, याबद्दल अपरूपवाईस त्याचा व त्याच्या कुटुंबातील मंडळींचा नेहमी मत्सर वाटू लागला. बेबनाव होऊन घरांत नेहमी कल सुरू झाले. त्यामुळे, तुकोजी कंटाळून, आपल्या खर्चाकरितो स्वतंत्र मुलूख तोडून घेऊन, महादेवपट्टण येथे जाऊन राहिला. तथापि तेवढयानेंही अपरूप बाईचे समाधान झाले नाहीं. तिनें दुष्ट स्त्रियांच्या नादी लागून गादीला आपला वारस करण्यासाठी खोटा पुत्र उत्पन्न करण्याचा कट केला व गरोदर राहिल्याचे ढोंग करून नऊ महिन्यानंतर एक कृत्रिम बालक निर्माण केले. सरफोजीस या गोष्टीची गंधवार्ताही नव्हती. त्या या कृत्रिम बालकास, आपला खरा पुत्र समजून त्याने त्याच्या जन्माची द्वाही जिकडे तिकडे फिरवून मोठा पुत्रोत्सव केला. क बारशाच्या दिवशी मोठया समारंभानें या मुलाचें "सवाई शहाजीराजे " असे नांव ठेविलें, राणी अपरूपबाई हिनें अशा रीतीनें तंजावरच्या राजगादीस खोटा वारस मोठया गुसपणानें व दक्षतेनें निर्माण केला. तथापि ही गोष्ट पुढे कांही दिवसांनी उघडकीस आली ! त्यामुळे सरफोजीस अतिशय दुःख व संताप उत्पन्न होऊन त्यानें त्या कृत्रिम पुत्राचा निकाल उडविला व पुढे लवकरच इ० सन १७२८ मध्ये तो दिवंगत झाला. त्या वेळी त्याच्या तीन स्त्रियांपैकीं सुलक्षणाबाई, व राजस बाई ह्या दोघी त्याच्याबरोबर सती गेल्या. सरफोजी राजे यांस औरस पुत्र- संतति नसल्यामुळे त्याचा धाकटा भाऊ तुकोजी हा गादीवर भाला.

 तुकोजी राजे यांच्या कारकीर्दीत जी राजकारणे किंवा ज्या लढाया वगैरे झाल्या, त्यासंबंधींची विशेष माहिती अद्यापि उपलब्ध नाहीं; तथापि उपलब्ध