पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९१ )

त्याच्या भावांनी त्यास पदभ्रष्ट करण्याबद्दल कांहीं कारस्थानें केल्यामुळे, त्याची संशयवृत्ति परमावधीस जाऊन तो जवळ जवळ वेडा झाला होता. कोणाच्या हातांत कट्यार असली, किंवा कोणाच्या हातीं कांहीं शस्त्र असलें तर त्यांस लागलीच संशय व भीति उत्पन्न होत असे. "कोणी बिदसि जाणार येणार देखील, यांहीं देवाचा नामोच्चार केला, किंवा त्याचा ओंठ हालूं लागला, अथवा एकीकडे कांहीं दोघे मिळून बोलू लागले, किंवा कोणाच्या हात जप- माळ पाहिली, तरी ती यांच्या ठाय, आपल्यास वश करण्यास किंवा मार ण्यास मंत्रयंत्र करीत आहेत, म्हणून निश्चयें करून समजून” ( श्रीमद्भोसले- वंश - चरित्र पृ० ७१ ) त्यांच्या पारिपत्यास तो उद्युक्त होत असे. व्यंको- जीच्या अशा वागणुकीमुळे राज्याचा कारभार विस्कळीत झाला; वहां संधि साधून कर्नाटक (अर्काट ) चा नबाय दोस्त अल्लो ऊर्फ दोस्त अल्लीखान याचा सेनापति व जांबई चंदासाहेव, हा तंजावरवर चाल करून आला. त्या वेळों तंजाबर येथील जुन्या पराक्रमी व एकनिष्ठ सरदारांनी मोठया शौर्यानें तेथील किल्लयाचे संरक्षण केले. अखेरीस किल्ला आपल्या हाती येत नाहीं, असें पाहून, खंडणी घेण्यास राजी होऊन, व ती घेऊन तो त्रिचनापल्ली येथे परत गेला;+


 + चंदासाहेब याचें मूळचें नांव हुसेन दोस्तखान असून तो मोठा धाडसी व महत्वाकांक्षी पुरुष होता, तो मोठा कुशाग्र बुद्धीचा, धूर्त, मधुरभाषणी व सुस्वरूप असल्यामुळे अर्काटचा नबाब दोस्त अल्लीखान याची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली; व त्याने त्यांस आपला घरजांवई करून वजीर व सेना- पति केलें. अशा रीतीने त्यास राजकीय महत्व प्राप्त झाल्यावर त्यानें दक्षिण हिंदुस्थानांत अनेक घडामोडी व कारस्थाने करण्यास सुरवात केली. अर्का- टच्या दरबारांत त्यानें आपलें उत्तम वजन बसविलें; व तंजावर आणि त्रिचनापल्ली येथील हिंदू राज्यें नामशेष करण्याची तो खटपट करू लागला. त्यापैकी तंजा- वरचें राज्य पादाक्रांत करण्याची त्याची खटपट यावेळी, (इ० सन १७३६) व पुढे प्रतापसिंहाच्या वेळी ही ( इ० सन १७४० ) निष्फळ झाला; तथापि त्रिचनापल्लीचें राज्य नामशेष करण्यांत तो यशस्वी झाला. त्रिचना- पल्ली येथील शेवटचा राजा विजयरंग हा इ० सन १७३१ मध्ये मृत्यु पावला, व त्याच्या गादीविषयों राणी मीनाक्षी व दुसरा वारस वंगारू तिरमल