पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८६ )

सुमारास त्यानें पुन्हतंजावर येथे मोंगली सरदार पाठवून, शहाजीराजे याज- कडून जिंजी येथील मराठयांना बिलकूल मदत मिळू नये, असा प्रयत्न केला. थोडक्यांत म्हणजे ह्या बिकट प्रसंगी शहाजीस आपले राज्यरक्षण करण्या करितां मोंगलाशी तह करणे भाग पडलें, व मोठ्या कष्टानेच तो व त्याचे राज्य मोगलांच्या तडाक्यांतून या वेळी वाचून जिवंत राहिलें.

 तथापि तंजावरच्या राज्यावर पुन्हां लवकरच दुसरें भीतिदायक संकट उत्पन्न झाले. इ० सन १७१० मध्यें कर्नाटक प्रांताचा नबाब दाऊदखान हा गुजराथचा सुभेदार झाला; व मोंगल बादशहानें त्याच्या जागी सादत उल्लाखान यांची नेमणूक केली. त्याप्रमाणे तो कर्नाटक प्रांत येऊन अधिकारा- रूढ झाला; व त्या वेळेपासूनच त्याने आपली सत्ता वृद्धिंगत करण्याची व तंजावर व त्रिचनापल्ली ही दोन्ही संस्थाने आपल्या सत्तेखाली आणण्याची खटपट आपल्या मृत्यूपर्यंत ( इ० सन १७३२ ) थोड्याफार प्रमाणांत सारखी सुरू ठेविली होती. तथापि त्यापासूल तंजावरच्या राज्यास म्हणण्यासारखा उपसर्ग पोचला नाहीं.

 शहाजीराजांची कारकीर्द प्रजेच्या दृष्टीनें सुखावह झाली व त्यानेही व्यंकोजीप्रमाणेच तंजावरचें राज्य उत्तम प्रकारें चालवून उत्तम लौकिक मिळविला. इतकेच नाही तर, तंजावर प्रांतावर मोगलांच्या स्त्राच्या झाल्या, तरी मुद्धां मोठ्या दक्षतेनें वागून, त्यानें आपली सांपत्तिक स्थिति व राज्याचा वसूल व्यंकोजीच्या कारकीर्दीइतकाच कायम ठेविला. शिवाय तो मोठा गुणज्ञ व रसिक जसून कवचाहि आश्रयदाता होता. शहजीच्या पत्नीचें नांव चिमाबाई हे असून त्यास अनेक गृहित स्त्रिया होत्या; तथापि त्यास औरस पुत्रसंतती नव्हती. शहाजी राजा हा ता० २७ सप्टेंबर इ० सन १७११ रोजी मृत्यू पावला; व त्यास औरस पुत्रसंतति नसल्यामुळे त्याचा धाकटा भाऊ सरफोजी हा तंजावरचा राज्याचा अधिपति झाला.

 सरफोजीराजे, हा शांतताप्रिय राज्यकर्ता असून त्याने आपला दिवाण आनंदराव पेशवे व सेनापति खंडोजी विचित्रे या उभयतांच्या मदतीनें आपला कारभार शांततेनें चालविला; तथापि कर्नाटकाचा नबाब सादत उल्लाखान, हा