पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८५ )

मंडळींनी, मातोश्री एसूबाईसाहेब हिच्या आज्ञेनें व अनुमतीनें राजारामास कर्नाटकमधील पांडेचरीजवळील जिंजी येथील प्रसिद्ध व बळकट किल्ल्यावर पाठविले व त्या ठिकाणी राजारामानें मराठयांची गादी तात्पुरती ठेवून पांच वर्षेपर्यंत मोगल सैन्याशी सारखी टक्कर दिली. या आणीबाणीच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जांवई हरजीराजे महाडिक [ शिवाजीची मुलगी अंबिकाबाई ही हरजीराजे यांस दिली होती.] हा जिंजी येथील किल्लेदार असून पटाइत तरवारबहाद्दर व कसलेला मुत्सद्दी होता. त्याने जिंजीच्या किल्लयावर मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवून राजारामास अमोल्य साह्य केलें- मराठी राज्याची अमोल्य सेवा बजाविली - - व त्यामुळेच मराठयांना मोगलार्शी सतत पांच वर्षे सारखे मोठया नेटानें व हिंमतीनें लढत राइतां आलें. या वेळी तंजावरकर शहाजीराजे हा राजारामाचा चुलतभाऊ असल्यामुळे मोंगल सरदार झुल्पिकारखान यानें त्याच्यावर स्वारी करून त्रिचनापल्ली प्रांतांतील तंजावरच्या राज्याचा कांहीं भाग त्याच्याकडून हस्तगत करून घेऊन खंडणी- ही वसूल केली [ इ० सन १६९१ ]. व पुढें इ० सन १६९६ च्या


मुसलमानी धर्माचा स्वीकार कर; " असा त्यास अतिशय आग्रह केला. त्यास बळी पडून सूर्याजीनें मुसलमानी धर्म स्वीकारून वाईची देशमुखी त्यानें संपादन केली. तथापि त्याच्या कुटुंबांतील कांहीं माणसें हिंदुधर्मांतच राहिली. इल्ली वाई जवळ ओझर्डे म्हणून एक गांव आहे. त्यागांव हिंदु व मुसलमान, अशी दोन्हींही पिसाळ घराणी अस्तित्वांत आहेत. सूर्याजीच्या ह्या देश- द्रोही व फितुरी वर्तनामुळे शाहूस सतत सतरा वर्षे मोंगलांच्या कैदेत अडकून रहावें लागले. तथापि शाहू पुढे सुटून आल्यानंतर त्याने सूर्याजीच्या ह्या दुष्ट कृत्याचा पूर्ण सूड उगविला. भावी काळांत शाहू हा ताराबाईशी युद्ध करीत करीत वांईजवळ आला. त्यावेळी त्याने या सूर्याजी पिसाळाच्या कुळां- तील लहान मुलें, व बायका याखेरीजकरून, सर्व पुरुषांची कत्तल करविली. व सूर्याजीस पकडून, त्याची नानाप्रकारें निर्भत्सना व हालहाल करून त्यास ठार मारविलें. अशा रीतीनें या दुष्ट, घातकी, फितुरी, व देशद्रोही मनुष्यास इहलोकींच त्याच्या कृतकर्माचें यथायोग्य प्रायश्चित्त मिळाले,