पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२८७ )

केव्हां तंजावर प्रांताला शह देईल, याचा नियम नव्हता; व त्याच्या उपस गची भांति कायम होती.

 सरफोजीराजे याच्या कारकीर्दीत एक अत्यंत महत्वाचें राजकीय स्थित्यं- तर घडून आले. ते म्हणजे "निजाम उल्मुल्क याच्या स्वतंत्र सत्तेचा प्रारंभ" हें होय. * या स्थित्यंतरामुळे अनेक निरनिराळे राजकीय परिणाम घडून आले; इतकेच नाहीं तर, "निजाम" या व्यक्तीने अठराव्या शतकांतील मराठ्यांचा, इतकेच नव्हे तर हिंदुस्थानचा, भावी इतिहास बनविला. मराठ्यांच्या छाती- वर निजाभाची ही नवीन धोंड कायमची येऊन बसली. निजामउल्मुल्क यानें दक्षिणत स्वतंत्र राज्यस्थापना केल्यानंतर तो दिवसेंदिवस सारखा बलाढ्य


 * चिनकिलोजखान ऊर्फ निजामउलूमुल्क (जन्म इ० सन १६७१ ता० ११ आगस्ट; मृत्यु इ० सन १७४८ ता० २१ मे ) हा दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापना करण्याच्या वेळी, मुबारीजखान या नांवाचा एक शूर मोंगल सरदार हैद्राबाद व कर्नाटक प्रांताचा कारभार पहात होता. त्यास बादशाह | महंमदशाहा, ( कारकीर्द इ० सन १७१९ ते इ० सन १७४८) नें “निजाम हा शिरजोर होऊन स्वातंत्र्य धारण करीत आहे, तरी तुम्ही त्याजबरोबर युद्ध करून त्यास ठार मारून टाकावें, आणि हें कार्य सिद्धीस गेल्यास दक्षिणचा कारभार तुमच्याकडे देण्यांत आला आहे, असे समजावें." असे स्वदस्तूरचें पत्र पाठबिलें, आणि अमानतखान सुभेदार व इब्राहीमखान, कंब्रज- खान व अबदुलखान हे तीन सरदार त्यांच्याबरोबर देऊन त्यांना मुबारीजखानाच्या मदतीस पाठविले. आधींच मुबारीजखान व निजाम उल्मुल्क या उभयतांमध्ये वैर होतें; व यशस्वी झाल्यास दक्षिण प्रांताचा कारभार देण्याचें मुबारीज- खानास बादशहानें अभिवचन दिले होतें. त्यामुळे, तो दिल्लीहून आपल्या मदतीस आलेले सैन्य व सरदार मंडळी यांना बरोबर घेऊन मोठ्या त्वरेनें निजामावर चाल करून गेला; व उभयतां सैन्याची, साखर खेडा ऊर्फ फत्ते- खर्डा, ( किंवा फत्तेखर्डा; हा गांव वन्डांत, बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यांत भोगावती नदीच्या कांठीं आहे. ) येथें गांठ पडून मोठे निकराचें युद्ध होऊन त्यांत निजाम विजयी झाला. मुबारीजखान व त्याचे दोन मुलगे,