पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८३ )

पट्ट; या एकंदर सुभ्याची मिळून ५७५३ गांवें होतीं व वसूल३२०५०००० प्याडी कलम ( Paddy Cullums ) होता. " प्याडी कलम " म्हणजे तांदूळ मोजण्याचें एक विशिष्ट वजन आहे. एक कलम म्हणजे [ जुन्या पद्ध- तीनें ] अजमायें मण* वजनाचे माप आहे. [ पारसनीसकृत तंजावरचें राजघराणे हे पुस्तक पहा.] तंजावरचें मुख्य उत्पन्न तांदूळ हे असल्यामुळे तांदुळाच्या मापांतच राज्याचें उत्पन्न दिलेले आहे; (Fulerton's "A Particular account of the Tanjore Country, and of its produce या नांवाच्या टिपणाच्या आधारें ही माहिती दिली आहे ) त्यावरून पाहतां व्यंकोजीच्या कारकीर्दीत तंजावर प्रांताचे फक्त तांदुळाचें उत्पन्न २,४०, ३७,५०० मण होते, अर्से निदर्शनास येतें.

 व्यंकोजीराजे हा मोठा धोरणी व व्यवहारचतुर होता, असें दिसते. त्याने आपल्या तिन्हीही औरस मुलांनी आपल्या मागें आपसांत भांडूं नये, ह्मणून आपल्या इयतींतच त्यांची निरनिराळी स्वतंत्र व्यवस्था करून ठेविली होती; ती अशी की, त्याने आपला वडील मुलगा शहाजी यांस तंजावरचें राज्य दिले होते. दुसरा मुलगा सरफोजी यास कुंभकोनम् जवळील साकोली हा महाल दिला होता. व तिसरा मुलगा तुकोजी यास तंजावरच्या दक्षिणेस असलेला महादेवपहम् हा गांव दिला होता. व्यंकोजी हा इ० सन १६८७ मध्ये मृत्यू पावला. व त्याच्या मांगून त्याचा वडील मुलगा शहाजी हा गादीवर आला.
 शहाजीराजे याची कारकीर्द मराठ्यांच्या दृष्टीनें विशेष महत्वाची असून


 * तांदुळाचें एक तंजावरी कलम माप म्हणजे सरासरी एक मण समजा. वयाचा, व प्याडीचें एक कलम माप म्हणजे अजमायें है मण समजावयाचा. वर तांदुळाचे कलम अर्से न म्हणतो प्याडीचें कलम असे म्हटले आहे, ह्मणून एक कलम म्हणजे मण असे समजावयाचें; आणि अगदी बरोबर माप म्हणजे एक कलम प्याडी म्हणजे ६३३४ पौड (वजनी ) असे समजावयाचे आहे.