पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७५)

ब्रिटिश सरकारकडून कांहीं नेमणूक आहे; व त्याशिवाय त्यांची खाजगी जिन- गीहि बरीच आहे. तंजावरचे राज्य, इ० सन १६६६ - इ० सन १६७५, पर्यंतच्या काळांत स्थापन झाले. त्यावेळी या तंजावर प्रांतांत दक्षिण अर्का- टचा कांहीं भाग, आणि त्रिचनापल्लांचा संपूर्ण प्रदेश यांचा समावेश होत होता. या लष्करी वसाहतवाल्यामध्ये ब्राह्मण व मराठे हे उभयतांहि होते; व उभयतांदि आपल्या देशापासून लांब असल्यामुळे महाराष्ट्रांत त्यांच्या उप- शाखा होऊन जे भेद झाले, ते तिकडे विसरले जाऊन सर्वजण " देशस्थ " या नांवानें परस्पराशी बांधिले गेले. "

 " तंजावर येथें जेवढे राजे झाले, तेवढे सर्व विद्येचे मोठे पुरस्कर्ते होते. व त्यापैकी कांही तर प्रसिद्ध कवी व पंडितहि होर्ते; व त्यांचे औदार्य तर थक्कच करून सोडण्यासारखे होतें. तंजावर येथे एक पुस्तकालय आहे. तेवढे पुस्तकालय हिंदुस्थानांतील दुसऱ्या कोणत्याही संस्थानांत नाहीं. तंजावर प्रांतांत त्या काळी गायन वादन इत्यादि कलांचा उत्कर्ष होऊन त्या अगदीं पूर्णत्वास पावल्या होत्या; व त्यावेळी दक्षिण हिंदुस्थानामध्ये अतीशय सुघार- लेला व उच्चत्वास पावलेला असा प्रांत म्हणजे " तंजावर प्रांत " अशी त्याची कीर्ति होती; व ती तशी अजूनहि आहेच. तंजावरचें राज्य नष्ट झाल्या- वर तेथील कलापंडित मंडळी त्रावणकोर येथे गेली; व त्यामुळेच या बाब ताँत त्रावणकोर हैं सध्यां इतकें प्रसिद्ध आहे. कुंभकोण या नांवाच्या बड्या शहरांत प्रसिद्ध मराठा घराण्यांचा चांगलाच शिरकाव झालेला आहे; व त्याच घराण्यांतील सर टी. माधवराव, दिवाणबहादूर रघुनाथराव, वेंका स्वामीराव, गोपाळराव, इत्यादि थोर पुरुष आपआपल्या धंद्यांत मोठे यश संपादून कीर्तिमान् झाले आहेत; आणि कांहींचा तर राजकार्यधुरंधरत्व, विद्वत्ता, व परोपकारबुद्धि इत्यादि गुणांबद्दल हिंदुस्थानांत मोठाच लौकिक झालेला आहे. त्रावणकोर आणि म्हैसूर येथील हिंदु राज्यकर्त्यांनी गेल्या व चालू शतकांतही ह्या मराठा मुत्सद्द्यांस आश्रय देऊन त्यांच्या अंगच्या असामान्य गुणांचा पूर्ण विकास होण्याला चांगल्याच सवलती दिल्या आहेत. त्रावणकोर येथील दिवाण " इंग्लिश सुबराव " यानें केलेली कामगिरी सर्वोस माहीत आहेच; त्याच्यानंतर झालेल्या दिवाणांपैकी सर टी. माधवराव यानें तर त्या राज्य