पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७४) लोकांची संख्या सुमारें २,३०,००० होती; यांत म्हैसूर, कोचीन व त्रावण. कोर येथील मराठे लोकांची २०,००० ही संख्या मिळविली तर एकंदर बेरीज २,५०,००० पर्यंत होते. त्यांची वांटणी खाली लिहिल्याप्रमाणे झाली होती, तीः- ( १ ) गंजम ( २ ) विजगापट्टण ( ३ ) गोदावरी ( ४ ) कृष्णा - १४४२१ त्रिचनापल्ली १७६६ १९४३ ८३७ ( ५ ) नेल्लूर ७९०६ ( ६ ) कडापा २०५ ( १२ ) तंजावर ३६४ (१३) ८३४ ( १४ ) मदुरा १४१४ (१५ ) तिनेवल्ली ८०७ ( १६ ) सालेम ३९७३ (१७) कोईमतूर ४०८१ ( १८ ) निलगिरी ४१६९ ( १९) मलबार १६३५ ( २० ) दक्षिण कानडा ११६६२ ( २१ ) मद्रास शहर १९५७ ( २२ ) पदुकोट २५५० ७३० ६१०७ ( ७ ) कर्नूल (८) बल्लारी (९) चिंगलपट (१०) उत्तर अर्काट ( ११ ) दक्षिण अर्काट १४७३९● ४२३८ ६६० " वरील कोष्टकावरून असे दिसतें कीं, मद्रास इलाख्यांत मराठे काय- मचें ठाणे देऊन अमुक प्रांतांत राहिले नाहीत, असा एकहि प्रांत नाही. दक्षिण कानडा, मलवार, कोचीन, व त्रावणकोर या ठिकाणी मराठ्यांची दीड- लाख वस्ति आहे; पण ती वसाहत समुद्रकिना-याच्या बाजूकडून झाली आहे, व तिचा आणि इ० सन १६५० च्या सुमारास शहाजी व त्याचा मुलगा आणि शिवाजीचा सावत्रभाऊ व्यंकोजी यांच्या सैन्यानें बें राज्य स्थापन केले, त्याचा कांहींहि संबंध नाहीं. शद्दाजी व शिवाजी यांच्याबरोबर दक्षिण हिंदुस्थानांत पुष्कळ मराठे आले होते; त्यामुळे त्यांचे वंशज तंजावर शहर व त्याच्या भोवतालचा प्रदेश, उत्तर अर्काट, सालेम व मद्रास शहर या ठिकाण पुष्कळ स्थाईक झालेले आहेत. त्रावणकोरच्या महाराजांनी तंजावरला " मराठ्यांचे दक्षिणेकडील घर " असे मोठे छानदार नांव दिले आहे. आणि तेथील राज्य, कोणी वारस नाही म्हणून खालसा होऊन जरी पन्नासांहून अधिक वर्षे झाली, तरी तेथील राण्या त्या शहरातच रहात असून त्यांना