पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७६)

तील अव्यवस्था, व त्या राज्याचा कर्जबाजारीपणा नाहींसा करून सर्वांनी कित्ता घ्यावा, असें नमुनेदार ते संस्थान केलें; व दिवाण बहादूर रघुनाथ- रावाच्या वडीलांनीही म्हैसूर संस्थानांत अशीच कीर्ति संपादन केली. "

 " उत्तर अर्काट या जिल्ह्यामध्ये " अरणी " ची एक छोटी जागीर आहे. ती अजूनपर्यंत एका मराठा ब्राह्मण संस्थानिकाकडे चालत आहे. व ती या संस्थानिकाच्या पूर्वजांनी दोनशेंहून अधिक वर्षांपूर्वी विजापूरकरांच्या पदरीं लढाईत कामगिरी बजाविली, म्हणून देणगीदाखल त्यांस मिळालेला आहे. त्या काळांत अर्काटच्या नबाबाच्या पदरी दुसरेही मराठा ब्राह्मण असून तेही प्रसि- द्धीस आले होते; व त्यांना " निजामशाही ब्राह्मण " असे म्हणत होते. व तसेंच पदुकोटचें लहानसें मांडलीक संस्थान अजून सुस्थितीत असून तेथें मराठ्यांची बरीच वस्ती आहे. या संस्थानाची राज्यव्यवस्था अनेक ब्राह्मण दिवाणांनी चालविली, व त्यापैकींचा एक अति प्रसिद्ध ब्राह्मण दिवाण, हा दक्षिण हिंदुस्थानांत आलेल्या मराठा वसाहतवाल्यांच्या कुटुंबांतीलच होता. कोचीन संस्थानांत पुष्कळ मराठे लोक आहेत. त्यापैकी बरेच निरनिराळ्या जातीचे ब्राह्मण आहेत व त्यांनी व्यापार धंदा चालविला आहे. बहारी जिल्ह्यांत सोंदा [ सोडूर ] या नांवाचें एक लहानसे मराठा संस्थान आहे; व दक्षिण हिंदुस्थानांतील मराठ्यांची सत्ता नाहीशी झाली, तरी ते संस्थान अजून हयात आहे. या संस्थानचा संस्थापक प्रसिद्ध संताजी घोरपडे याच्या वंशांतीलच होता. संताजीचा नातू मुरारराव घोरपडे यानें इ० सन १७५०- च्या सुमारास कर्नाटकमधील लढायांत विशेष शौर्य दाखविलें व गुत्ती येथील छोटें संस्थान हैदरअल्लीच्या ताब्यांत जाईपर्यंत त्या संस्थानावर मुराररावानेंच राज्य केले. औरंगझेबानें महाराष्ट्रावर स्वारी करून मराठ्यांना पेंचांत आणिलें, तेव्हा शिवाजीचा दुसरा मुलगा राजाराम हा जिंजी येथे जिजी हा शहाजीचा किल्ला असल्यानें- जाऊन राहिला. ह्याच किल्लयास सतराव्या शतकाच्या अखेरीस मोंगलांनी वेढा दिला. याच किल्लयानें सतत सात वर्षेपर्यंत शत्रूशी झुंजून मरा- व्यांचे संरक्षण केलें, व त्यामुळेच एवढ्या मुदतीत आपली स्थीरस्थावर करून मराठ्यांना मोंगलाशी टक्कर देण्यास चांगलीच फुरसत मिळाली.

 " वर लिहिलेल्या त्रोटक हकीकतीवरून असे दिसून येईल की, मुसलमानी