पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)

 वरील विवेचनावरून लुकजी जाधवराव याची योग्यता, कर्तृत्वशक्ति, मान- मरातब व राजकीय महत्त्व केवढे होतें, याची सहज कल्पना होते; व त्यामुळेच मालोजी व विटूजी भोंसले हे उभयतां बंधू, लुकजीच्या आश्रयास येऊन राहिले, हैं उघड होतें.

 या उभयतां बंधूंपैकीं मालोजी हा शरीरानें अतिशय धिप्पाड व मजबूत असल्यामुळे त्याच्या स्वारीस चांगला भरभक्कम घोडाही टिकत नसे; म्हणून


 निळकंठेश्वराचें देऊळ जाधवरावाच्या काळापेक्षां बरेंच जुनें आहे; त्या- वरील लेख वाचला जात नाहीं.

 शिंदखेड, देऊळगांव व त्या बाजूचा कांहीं प्रदेश अजमायें पन्नास साठ वर्षे शिंद्याच्या ताब्यांत होता; तो आसईच्या युद्धानंतर निजामच्या ताब्यांत आला; देऊळगांव राजा येथील बालाजीस त्या गांवासंबंधी सनदा दिलेल्या आहेत.

 या शाखेतील अखेरचा प्रसिद्ध पुरुष म्हणजे राजे बाजीराव जाधव हा असून तो औरंगाबाद येथें रहात असे; व निजामच्या दरबारांत त्याचें अती- शय वजन असे; आणि निजामाच्या राज्यांतील, व वन्हाडांतील या घराण्याचे सर्व उत्पन्न बाजीरावाच्या वेळेपर्यंत या घराण्यास मिळत असे. इ. सन १८५१ मध्ये त्याच्यावर एक मोठेंच संकट आलें, व त्यांत तो सफाई बुडाला. बाजीरावाच्या हातांखाली, औरंगाबाद येथे आरब लोकांचें लष्कर असे; या लष्कराची, व इंग्रजी सबसीडियरी ( तैनाती ) सैन्याची लढाई होऊन त्यांत कांहीं इंग्रज अधिकारी मारले गेले; त्यावरून राजे बाजीराव याचे सर्व वतन जप्त करून त्यास दौलताबादच्या किल्लयांत प्रतिबंधांत ठेवण्यांत आलें; व पार्ल- मेंटपर्यंत प्रकरण जाऊन त्याचें सर्व वतन खालसा झालें. राजे बाजीराव याचें म्हणणें कीं, "वरील आरब शिपाई आपल्या कह्यांत नव्हते; व दंग्यांत आपला कांहीही संबंध नव्हता; इतकेच नव्हे तर त्यांचा पगार तुंबल्यामुळे ते आप- णावरच उलटले;" परंतु बाजीरावाच्या ह्या म्हणण्याचा तिळमात्रही उपयोग झाला नाहीं; तो इ. सन १८५९ मध्ये दौलताबाद येथील किल्लपांत कैदेत असतांनाच तेथें मृत्यू पावला. जानेफळ, फत्तेखर्डा या गांवच्या व इतर पाटीलकीची वतनें, व खेर्डा येथील जहागीर ह्या वेळेपर्यंत या जाधव घराण्या-