पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८)

जाधवरावाने त्यास आपल्या देवडीवर ठेविलें होतें; परंतु ही कामगिरी मालो- जीस पसंत पडली नाहीं; त्यामुळे तो फलटणकर वर्णगपाळ ऊर्फ जगपाळराव


कडे होती, ती खालसा झाली; इतर तीन शाखांचीं वतनें कायम आहेत; तथापि देऊळगांवच्या शाखेची बहुतेक इष्टेट ( मालमिळकत ) सावकाराच्या कजत गेली आहे.

 जानेफळ — हें शिंदखेडकर जाधवरावांच्या पार्टिलकांचें गांव होतें; तेथें त्यांची एक मोठी गढी अद्याप अस्तित्वांत आहे; राजे बाजीराव याचें वतन जप्त झाले, त्यांत हेंही वतन गेलें; जानेफळ, हें अव्वल इंग्रजीत जिल्ह्याचें ठिकाण होतें; नंतर तें बुलढाणा येथें गेलें,

 फत्तेखर्डा—भोगावती नदीच्या काठीं; या गांवाचें मूळ नांव साखरखेर्डा; हैं प्रसिद्ध अमृतराय कवीचें जन्मस्थान व मूळचें गांव; या ठिकाण ता. २ आक्टोबर ३० सन १७२४ या वर्षी निजाम व दिल्लीचे मोंगल यांच्यामध्यें मोठे युद्ध होऊन त्यांत निजामाची फत्ते झाली, म्हणून यांस फत्तेखेर्डा हैं नांव मिळाले. या विजयानें निजाम स्वतंत्र झाला. दिल्ली येथील मोंगल सरदार मुबारिजखान हा युद्धांत ठार झाला, त्याची कबर लढाईच्या मैदानांत असून त्यास इनाम जमीन आहे. येथे इ० सन १५८१ मध्ये खुदावंतखान मेहदवी या नांवाच्या एका निजामाच्या सरदाराने बांधलेली एक सुंदर व प्रेक्षणीय मशीद आहे; व याच मशीदीच्या अगदी सारखी आणि एकाच वर्षांच्या अंतरानें अशी त्यानेंच बांधिलेली दुसरी मशीद मलकापूर तालुक्यांतील रोहीणखेड या गांवों आहे; आणि पलसिद्ध या नांवाच्या जंगम साधूचा मोठा प्रसिद्ध मठ गांवाबाहेर आहे.

 इ० सन १८१८ मध्ये, दुसरा बाजीराव पुण्याहून पळाल्यानंतर शिंद- खेड मार्गाने गेला, त्यावेळी तो तेथें कांहीं दिवस मुक्काम करून राहिला होता; या पळापळतिच तो पैनगंगातीरी असलेल्या उमरखेड येथें कांहीं दिवस मुक्काम करून तेथून तो केळापूर-पांढरकवडा येथे पळाला, व तेथें कांहीं दिवस मुक्काम करून राहिला; इतक्यांत ता. २ माहे एप्रील इ. सन १८१८ रोजी मि. स्कॉट, व अॅडम्स या उभयतां इंग्रज सेनानायकांनीं तेथेंच बाजीरावास गांटून त्याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला; त्यामुळे