पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बानें निजामशाहास एका दिवाळीत भाऊबीज केली होती; आणि पादशाहानें विजापूर व दौलताबाद सरकारच्या देशमूल देशपांडेपणाचें फर्मानही लुकजीस करून दिलें होतें.

 जाधवरावाकडे एकंदर सत्तावोस मद्दाल व बावन्न चावड्यांचा अधिकार असे; व त्यास दत्ताजी, अचळोजी, बहादूरजी व राघोजी असे चार पुत्र होते* त्यापेकीं बहादूरजी हा, भूताजीस पुत्रसंतान नसल्यामुळे, त्यास दत्तक दिला होता.


 *या शिंदखेडकर जाधव घराण्याच्या पुढे चार शाखा झाल्या; व त्यांनी चार गांव जवळजवळच वस्ती केली; म्हणजे उपरीनिर्दिष्ट चारी भावांनी अनुक्रमें अडगांव, मेहुर्णे, किनगांव व शिंदखेड या गांवों आपली ठाणों दिलों; व शिंदखेडची शाखा पुढे देऊळगांव येथे येऊन राहिली. ह्या चारी शाखा आजतागायत त्या त्या गांवीं अस्तित्वांत आहेत; या सर्व गांवांना जाधव- रावाच्या नांवावरून " राजा " हें उपपद चालू आहे; व सदरहू गांवच्या पाटिलक्या व देशमुखी ( देऊळगांव राजा येथील शाखेचें खालसा झालेलें वतन खेरीजकरून ) वतनें आजतागायत त्यांच्या वंशजांकडे चालू आहेत. ( काळेकृत वाडचा इतिहास पहा; ) शिंदखेड येथें जाधवरावांच्या संबं धाच्या खालील इमारती आहेत, त्याः-

१ निळकंठ महादेवाचें देऊळ, व निळकंठ बारव [ जुनें ].
२ जाधवरावांचे पडके महाल, त्यावर लेख आहेत; विशेषतः रंगपंचमी
महाल.
३ कचेरीचा महाल [ यांत हल्ली मराठी शाळा आहे. ]
४ रामेश्वराचे देऊळ १
५ लखूजी जाधवरावांचे कबरीचे घुमट व सतीचें देऊळ.
६ जाधवरावांचा तलाव, बंगला, व त्यांतील घाटाची रचना.
७ जलविहाराचा लहान तलाव.
८ सजनाबाईची विहीर,
९ काळा कोट.