पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६२ )

पुष्कळ वर्षाची संवय घालवून अंगावर जबाबदारी टाकून लायकी उत्पन्न कर ण्याच्या महत्वाच्या कार्यास शहाजीच्या काळापासून प्रारंभ झाला. कित्येक शतकें पारतंत्र्यांत राहण्याची संवय झाल्यामुळे, प्रारतंत्र्यांतील वैभव सुखांत कालक्रमणा करीत राहण्याची मराठे सरदार मंडळींत भिनलेली आकुंचित व स्वार्थी प्रवृत्ति, शहाजीच्या काळापर्यंत कायम होती. ही प्रवृत्ति, उदात्त कल्पना, उच्च राष्ट्रीय कर्तव्य, व उज्वल देशकार्य, यांच्या नेहमीच आड येणारी असल्याने ती नाहींशी करणे, हीच प्रमुख, व महत्वाची बाबत असून ती सिद्धीस नेण्याच्या प्रयत्नास शहाजीनेंच प्रथम सुरुवात केली. स्वराज्य स्थापून विविक्षित मर्यादेत स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश, व स्वजन यांचे पालन, लालन, व संरक्षण करण्याच्या श्रेष्ठ कर्तव्याचा खडतर मार्ग आक्रमण्यास, अनेक आपत्तीशों झगडत राहून, शहाजीनेंच पहिल्यानें प्रारंभ केला. मुसलमानी राजकर्त्यांची चाकरी करून पोटाला भाकरी मिळविणें, यांतच आपल्या जन्माची इतिकर्तव्यता नसून त्यापलीकडील लोककल्याणाचें श्रेष्ठ कर्तव्य करून जगात अखंड कीर्ती मिळविण्यां- तच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे, ही भावना तत्कालीन मराठा मंडळांत शहाजीच्याच ठायीं प्रथम उत्पन्न झाली. मराठ्यांच्या अंग माणुसकी आहे, ते जित मुसलमान राज्यकत्यांच्या आश्रयानें गुलामगिरीत सुख मानून नांदत आहेत तरीसुद्धा त्यांचा स्वाभिमान जिवंत आहे, ही जाणीव मुसल- मानी राज्यकर्त्यांना शहाजीने आपल्या कर्तबगारीनें प्रथम करून दिली. स्वराज्य संस्थापनेच्या कल्पना, कांहीं अंशानें को होईना, उदय पावण्याच शहाजीच्या काळापासून पहिल्यानें प्रारंभ झाला. प्राप्त झालेल्या परिस्थितीत जे श्रेष्ठ फळ मिळविणे शक्य होतें तें मिळविण्याचा उद्योग शहाजीनेच पहिल्याने आपल्या शिरावर घेतला. कर्धी काळाला बगल देऊन तर कधीं काळाबरोबर झगडून स्कराज्य संस्थापनेचा प्रयोग, मर्यादित व्याप्तीत का असेना, शहाजीनेंच पहिल्यानें यशस्वीपणें सिद्धीस नेला. स्वराज्य संस्थापनेच्या पहिल्या प्रयत्नांत अपयश आल्यावर, आणि दुसन्या प्रयत्नांत माघार घेणे भाग पढल्यावरही, हताश न होतां हिंमत बांधून पुन्हांही प्रयत्न करीत राहून यशस्वीपणें आपलें ध्येय गांठण्याचे महत्कार्य शहाजीनेंच प्रथम घडवून आणिलें. दख्खनच्या राजकीय पटावरील, आदिलशाही, कुत्बूशाही, निजामशाही व