पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६१ )

यांत संशय नाहीं; परंतु शहाजीचा व्यवहार त्या सिद्धांताहूनहि खरा होता, हॅ व्यवहारज्ञ स्वत:च्या अनुभवानें सांगूं शकतील. अपवाद खरे असतात, म्हणूनच सिद्धांतांना चिटकावेलेले असतात. स्थितीच अशी होती को, दुटप्पी- पणाशिवाय शहाजद्दान, औरंगझेब मौरजुम्ला, महंमदशहा, फत्तेखान, मुस्तफाखान, इत्यादि कपटनाटक्यांच्या मध्ये शहाजीचा सरळपणानें टिकाव लागला नसता. " ही गोष्ट खरी असली तरी, थोडक्यांत सांगायाचे म्हणजे, शहाजीची घरसोडीची वागणूक व तिचे अनिष्ट परिणाम, व शिवाजीची निश्चित वागणूक, त्यामुळे शिबाजीची झालेली महत्ववृद्धि व तिचे फायदेशीर परिणाम, शिवाजीचें असामान्य दूरदर्शित्व, परिस्थितीचें योग्य आकलन करण्याची अलौकिक बुद्धिमत्ता, निःस्वार्थी मनानें व आत्मयज्ञानें अननुभवित अशो दुःसह संकटें, व दुर्धर प्रसंग भोगीत राहून महाराष्ट्रांत स्वराज्य स्थापन करण्याची कार्यक्षमता, वगैरे गोष्टी, वरील लेखावरून व शिवाजीच्या उद्गारावरून स्पष्ट होतात; व त्यावरूनच शहाजीची मर्यादित आकांक्षा दृष्टोपत्तीस येऊन शिवाजीची व्यापक दृष्टी, व अलौकिकत्व हीं सिद्ध होतात.
 तथापि, महाराष्ट्राच्या दृष्टीनें, शहाजीचा काळही, शिवाजांच्या काळाच्या खालोखाल का होईना, पण अत्यंत महत्वाचा असाच आहे; शहाजीच्या काळापासून महाराष्ट्रांतील जनतेत कित्येक नव्या कल्पना व विचार उत्पन्न होण्यास सुरवात झाली; महाराष्ट्रांतील जनतेत लायकी उत्पन्न करण्याचा प्रयोग सुरू करण्यांत आला; कित्येक शतकें मुसलमानी अमलाखाल, व सूत्र- चालकत्वाखाली दुय्यम दरजांची कामे करीत राहण्याचेंच तत्कालीन मराठे मंडळीच्या आंगवळणी पडलेले असल्यामुळे, जबाबदारी अंगावर टाकल्या- मुळेच उत्पन्न होणारी लायकी शहाजीच्या काळापर्यंत त्यांच्यांत नव्हती; व अशी लायकी आपणांत असेल, आहे, अथवा येईल, अशीही कोणालासुद्धां फारशी कल्पना नव्हती; परंतु कर्त्याव्यक्तीच्या अंगावर जबाबदारी टाकून त्यांच्यांत ती लायकी शहाजीनें प्रथम उत्पन केली; सेवावृत्तीच्या सांप्रदा- यांत जबाबदारी अंगावर घेण्याची संवय नसल्यानें दुय्यम अधिकार चालवून वरिष्ठांचे हुकूम बजावर्णे एवढेच कार्य करीत राहण्याची अंगांत मुरलेली