पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६३ )

मोंगलाई मोहरी कशी हालचाल करीत आहेत, याचे निरिक्षण करून त्या घोरणानें आपली मोहरों चालवून, कर्धी त्यांना शह देऊन तर कर्धी त्यांनी दिलेल्या शहामुळे माघार घेऊन, त्या सर्वांवर अखेरीस मात करण्याचा पहिला मान प्रारंभी शहाजीनेच मिळविला. शहाजीसारख्या स्वराज्यवाद्यांच्या चळवळी जागच्याजागींच, पार नामशेष करून ते पुन्हां केव्हाही वर डोकें काढणार नाहींत इतक्या परमावधीपर्यंत त्यांना झोडपून काढून जिंकलेल्या प्रजेवर दहशत बसविण्याचा मुसलमानी राज्यकर्त्यांनी पुष्कळ वेळा प्रयत्न केला. परंतु अशा आपत्तींना तोंड देऊन व आपली चळवळ कायम ठेवून शांत वृत्तीनें स्वराज्य संस्थापनेचा खडतर मार्ग आक्रमीत राहण्यास शहाजीनेंच प्रथम पुढे पाऊल टाकिलें. स्वतः पुढाकार घेऊन कांहीही न करता, आद्य प्रवर्तकत्वाची प्रसंगी सर्वनाश करणारी जबाबदारी दुसन्यावर टाकून, युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याचा आव आणून दुसऱ्यांना तोंडानें उपदेश करीत बसण्या- पेक्षां स्वतः पुढाकार व जबाबदारी पतकरून, आपल्या प्रत्यक्ष वर्तनाचा धडा लोकांपुढे ठेवून, त्या वर्तनाच्या जोरावर जनतेमध्यें चोहोकडे सारखी जागृती फैलावर्णे, व फैलावीत राहणे, हॅ जें स्वराज्यवाद्यार्चे आद्य कर्तव्य, तें शहाजीनें आपल्या वर्तनाने व आत्मयज्ञानें प्रथम सिद्ध करून दाखविले. या कर्तव्यसिद्धीमुळे मराठयांत आत्मविश्वास उत्पन्न झाला; मुसलमानी राज्यकर्त्यांची, निदान वरपांगीं तरी बुद्धि पालटली; मराठथाबद्दल त्यांच्या मनांत द्वेष असला तरी वरपांगी ते त्यांना योग्य मानसन्मान देऊन वागवूं लागले. शहाजीनें आरंभिलेल्या स्वराज्य संस्थापनेच्या सत्कार्याला सहानुभूती असलेल्या लोकांची मनें खंबीर होऊन, व त्यांची बुद्धि स्थिर होऊन, त्या सत्कार्याची प्रवृत्ती बळावत गेली; व त्या बरोबरच मुसलमानी राज्यकर्त्यांना नरम पाडण्याची जित मराठयांची शक्तीही वृद्धिंगत होत गेली. शहाजी हा प्रारंभापासूनच मुसलमानी राज्यकर्त्याचा आश्रित, मदतगार व कैवारी असून सुद्धो, त्याला ज्या अर्थी स्वराज्य संस्था- पनेचा उद्योग हात घ्यावा लागला, त्याअर्थी मुसलमानी राज्यपद्धती मुळां- तच सदोष असली पाहिजे, हे उघड होतें. शहाजीनें निजामशाही व आदिलशाही राज्ये जगविण्याकरितां, व त्यांचें वैभव वाढविण्याकरितां आपली