पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५१ )

असती तर ती याचक वृत्ती आहे, असे म्हणून आदिळशाहानें ती लागलीच फॅटाळून लाविली असती; पण शिवाजी आपणहून बलाढ्य, निदान तुल्यबल झाल्याची आदिलशहाची खात्री झाल्या- बरोबर याचकवृत्तीचे शिष्ठाईत रूपांतर झाले; व शहाजीच्या मध्यस्थीनें शिवाजी व आदिलशाहा यांच्यामध्यें तह घडून आला व तो आदिलशहास व त्याच्याहूनहि पुष्कळच अघोक प्रमाणांत शिवाजीस फायदेशीर झाला. विजा- पूरकराबरोबरील युद्ध, व शहाजीमार्फत आदिलशहाशी झालेला तह, यामुळे कल्याणपासून तहत बेदनूर पर्यंत कोंकण किल्ले सुद्धां राज्य शिवाजीचें झालें; विजापूरची पादशाहत फार करून त्यांनी घेतली." आणि वस्तुतः यावेळेस शिवाजीनें स्वराज्याची स्थापना संपूर्ण केली. "शिवाजीची अगर्दी प्रथमची अडचण निराळीच होती. विजापूरच्या ताबेदारीत मोठमोठी सरदार घराणीं गुंतलेली होती. त्यांचे मनांत शिवाजीबद्दल अभिमान अगर पूज्य बुद्धि नव्हती व ती असण्याचे कारणही नव्हतें. हे सर्व सरदार आदिलशाचे पिढीजाद नौकर असून, स्वतंत्र राज्य स्थापना त्यांस कितीही संमत असली तरी ते त्या कामी पुढाकार घेण्यास समर्थ नव्हते. मावळे लोक शिवाजीला एकदम मिळाले, यांत त्यांनी मोठासा स्वार्थत्याग केला नाही. शिवाजीचा प्रयत्न फसून ते राज• द्रोही बनले असते, तरी त्यांचे नुकसान म्हणण्यासारखे झाले नसतें. परंतु सर दारलोकांची स्थिति पुष्कळ निराळी होती. त्यावेळी ते आपल्या धन्यावर उठून शिवाजीसारख्या बंडखोरास सामील झाले असते तर, शिवाजीचा पाडाव झाल्यास त्या सर्व घराण्यांची अत्यंत दुर्दशा झाली असती; त्यांची उत्पन्ने खालसा होऊन घरें दारें लुटली जातीं; आणि त्यांची पिढीजाद चालत आलेली वतनें जाऊन ते भिकेस लागले असते. शिवाजीच्या बंडास कायदेशीर राज्याचे स्वरूप येईपर्यंत लोकांना त्याचा पक्ष स्वीका- रितांना फार दूरवर विचार करावा लागे; म्हणून स्वजातीय सरदारांस आपल्या पक्षाची सत्यता व सामर्थ्य दाखविणे हे शिवाजीचे पहिले काम होतें. मोहिते घोरपडे, भोरे, सांवत, दळवी, सुर्वे, वगैरे सरदार आरंभापासून कमीजास्त प्रमाणाने शिवाजीच्या विरुद्ध होते; तेव्हां “मी तुमचें संरक्षण करण्यास समर्थ व योग्य आहे. " अशा प्रकारचा वचक आपणांविषयीं स्वजातियांमध्ये