पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५२ )


शिवाजीनें उत्पन्न केला; हा या वरील (विजापूरकराबरोबरील ) युद्धाचा परि णाम होय. ह्यावरून शिवाजीची कर्तबगारी व्यक्त होते. इतर सरदारांप्रमाणें शिवाजीही आदिलशाहाचा अंकित होता; पण एकदां मनाची खात्री झाल्यावर अत्यंत साहस करून तो उघडपणे बंडखोर बनला, आणि लवकरच स्वतंत्र राज्य स्थापून त्याने आपला बंडखेरपणा नाहींसा केला. " ( मराठीरिसायत भाग पहिला; पान २७३पहा.) तथापि विजापूरकराबरोबरील हा तह शहाजी- मार्फतच घडून आला असल्यामुळे, शिवाजीच्या स्वराज्याची स्थापना संपूर्ण करण्याचे, व " स्वतंत्र राज्यकर्ता " या पदवीला त्याला नेऊन बसविण्याचें श्रेय, जरी मुख्यत्वेकरून ते शिवाजीस आहे तरी शहाजीसहि तें कांही प्रमा- णांत दिले पाहिजे, हे उघड आहे.

 शहाजीनें निजामशाहीत व आदिलशाहीत जे प्रचंड उद्योग केले त्यामुळे जित लोकांमधील एक हिंदु अथवा मराठा सरदार, या नात्यानें त्याची कर्तब- गारी मुसलमानी राज्यकर्त्यांच्या नजरेपुढे येऊन, कोणताहि हिंदु सरदार बलिष्ठ मुसलमानी सत्तेविरुद्ध केव्हांहि वर डोकें काहूं शकणार नाही, हा त्या राज्यकर्त्यांचा नाहींसा झाला; पण त्यापासून महाराष्ट्रास व्यापक दृष्टीचा राष्ट्रीय फायदा झाला नाडौंं; समाजास जिवंतपणा आला नाहीं; राष्ट्रास शिस्त लागली नाहीं. शहाबांच्या काळापर्यंत महाराष्ट्रांतील मराठे व इतर लढाऊजाती, जो धनी आपल्या पोटाला देईल, त्याची नौकरी करीत असत; आणि कोणता घनी स्वकीय आहे, व कोणता परकीय आहे, ह्या प्रधान भेदास महत्व न देतां, कोणत्या धन्याकडून आपणांस भाकरी मिळेल, ह्या गौण प्रश्नास महत्व देत असत; महाराष्ट्रातील एकाच गांवांतील व गोतांतील भाऊचंदापैकीं, कांहीं लोक मराठा सरदारांच्या, कांहीं मुसलमान सरदारांच्या कांहीं दक्षिणतील शाह्यांच्या व कांही मोंगली बादशाहीच्या लष्करी नौकरीत असत; आणि खुद्द शहाजीची ही स्थिति तशाच प्रकारची होती. तो व त्याचा बाप मालोजी हे उभयतां निजामशाही नौकरीत होते; तो स्वतः नंतर आदिल- शाही नौकरीत राहिला होता. त्याचे चुलत भाऊ, व सासरा जाधवराव याचे घराणे मोंगली बादशाहीच्या नौकरीत होते; व त्याचे कुळभाऊ आदिलश ही व बेरीदशाही सैन्यांत होते; अशा परावलंबी व स्वार्थी स्थितीत