पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५० )

तशी राज्यास बळकटी किल्लयांची आहे; किल्लघांच्या योगानें औरंगशहा ( अवरंगझेब ) सारख्याची उमर गुजरून जाईल, " ( म. सा. छो. बखर पान ३९ पहा. ) त्याप्रमाणेंच ( शिव दिग्विजयांत लिहिल्याप्रमाणे म्हणा- वयाचें ( म्हणजे, ) " आपणास धर्म संस्थापना व राज्य संपादन करणे; सर्वांस अन्न लावून, शत्रू प्रवेश न होय, तें किल्लयांमुळे होतें; सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा ( मोंगल बादशहासारखा ) शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुन तीनशे साठ किल्ले इजरतीस ( आपल्या ताब्यांत ) आहेत; एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत. " यावरून शिवाजीस किल्लयांचें किती महत्त्व वाटत होतें, व शहाजीचें उदा- हरण डोळ्यापुढे ठेवून तो किती दक्षतेनें वागत होता, हे कळून येतें.

 शिवाजीनें महाराष्ट्रति स्वराज्य स्थापना केल्यानंतर इ. सन १६६२ मध्ये त्या स्वराज्याची शहाजीनें जी कामगिरी बजाविली, तिचाहि उल्लेख " शहा- जीची योग्यता " या दृष्टीने या ठिकाणी करणे आवश्यक आहे. शिवाजीनें सांवत, दळवी, घोरपडे, जंजिरेकर वगैरे प्रमुख सत्ताधाऱ्यांना आपल्या योग्य दाबाखाली आणिलें; अफजलखान व सिद्दीजोहार यांचे शिवाजीनुढे कोही न चालतां, उलट आदिलशाही सैन्याची नासाडी झाली, शिवाजीनें आदिलशाही राज्यावर आपला शह बसविला, तिकडे कर्नाटकमधील बंड सारखे बळावत चालले, व इकडे महाराष्ट्रांत शिवाजी व तिकडे कर्नाटकांत शहाजी, हे उभ- यतां अत्यंत प्रबळ झाले; शिवाजीनें आत्मयज्ञाच्या जोरावर आदिलशाहीशीं झुंजत राहून तिचे मनुष्यबळ, व द्रव्यबळ सारखें आटवीत राहण्याचा धडाका चालविला, वगैरे गोष्टींमुळे आदिलशहास दहशत बसली; या एकंदर राजकीय अस्वस्थतेमुळें तो अतीशय भिऊन गेला; शिवाजीशीं सामोपचारानें सख्य करावें, असा त्याने विचार केला; व शिवाज वळला तर शहाजीमार्फतच वळेल, असे जाणून, त्यास विजापूर येथे बोलावून घेऊन, शिष्टाईच्या मार्गानें शिवाजीशी सख्यत्व करून देण्याची कामगिरी त्यास आदिलशहानें सोपविली. ज्यावेळी आदिलशहाच्या बाजूस अधीक शक्ति असून शिवाजी तुल्यबल नव्हता, त्यावेळी अशा शिष्टाईचा मार्ग स्वीकारणे आदिलशाहाच्या स्वप्नांतहि येण्याचे कारण नव्हतें; आणि ही शिष्ठाई त्यावेळी जर शिवाजीने सुरू केली