पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४९)

तोच शिवाजीनें हाती घेतला, व त्यामुळेच, ज्या कारणामुळे बहुतांशीं शहा- जीस अपयश आलें, तें प्रमुख कारण नाहीसे होऊन, शिवाजी आपल्या आंगी• कृत कार्यात यशस्वी झाला.

 शहाजीनें निजामशाही व आदिलशाही राज्यांत असतांना स्वतःच्या हिंमतीवर केलेल्या प्रचंड उद्योगांतील कित्येक गोष्टी-जरी शहाजीला आपल्या उद्योगांत अपयश आलें तरी, शिवाजीस त्याच्या भावी राष्ट्र संस्थापनॆत व संवर्धनांत मार्गदर्शक झाल्या; शहाजीचें उदाहरण लक्षांत ठेवून एकाच वेळीं अनेक शत्रू उत्पन्न होणार नाहीत अशी त्यानें खबरदारी घेतली; ज्या शत्रूशी प्रत्यक्ष युद्ध चालू नसेल, त्याच्याशीं आगळिकीनें त्यानें शत्रुत्व उत्पन्न केले नाहीं; आपल्या स्वराज्य संस्थापनेच्या कार्यांत मिळेल तितकें यश, व होईल तेवढा फायदा, यांचा त्यानें अव्हेर केला नाही; शहाजीच्या उद्योगाची चिकाटी तो विसरला नाहीं; आणि निराशेचे किंवा अपयशाचें दुःखही त्याला जाणवले नाही; शहाजीजवळ सैन्य थोडें होतें; शिवाजीनें ती उणीव भरून काढिली; शहाजीजवळ तोफा व पायदळ सैन्य नव्हते; त्यामुळे त्यास अह मदनगरसारखी शहरें सुद्धां घेतां आलीं नाहीत; शिवाजीनें तोफा, व पाय- दळ सैन्य, यांचा मुबलक सरंजाम सज्ज ठेवून कित्येक किल्ले लढून घेण्यांत त्यांचा उपयोग केला; शहाजीनें नाशिकपासून चांदवड पर्यंतचे, मनमाड जवळील अणकाई, टणकाई, औध, पट्टा, साल्हेर, मुल्हेर, मालेगांव जवळील घोडप वगैरे सत्तावीस किल्ले एक महिन्यांत इस्तगत करून घेतले; पण त्यांत पूर्ण बंदोबस्त करून प्रसंगी प्रत्येक किल्ला लढविण्याची व्यवस्था करण्यास त्यास अवसर सांपडला नाहीं; त्यामुळे मोंगलांनी हे सर्व किल्ले तितक्याच वेळांत पुन्हां परत आपल्या ताब्यांत घेतले; शिवाजीनें प्रत्येक किल्ला हस्तगत करून घेऊन तेथे तो कित्येक महिनें लढविण्याचा उत्तम बंदोबस्त केल्यावर दुसरा याप्रमाणे अनेक किल्ले हस्तगत केले व नेहमी पुष्कळ पैसा खर्च करून त्या किल्ल्यांची उत्तम व्यवस्था ठेविली; त्यावेळी जवळच्या मंडळींनीं, " किल्ले बहुत झाले; विनाकारण पैका खर्च होतो, " असा अर्ज केला; तेव्हां शिवाजी त्यांना म्हणाला:- " जैसा कुळंबी शेताम्र माळा घालून शेत राखितो तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत; तारवांस खिळे मारून बळकट करितात