पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४८ )

झाली; व नानाप्रकारचा लोकसंग्रह करून, त्याची राष्ट्रीय कार्यासाठी एक अमोघ शक्ति बनविण्याची ताकद शिवाजीच्या ठायीं उत्पन्न झाली. मुसल मानी राज्यांत तोलदार मनसबदारी मिळविणे, ह्या गोष्टीस शहाजीच्या काळापर्यंत जे एक प्रकारें विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले होतें तें शिवाजीच्या राष्ट्रीय धोरणामुळे कमी कमी होण्यास प्रारंभ झाला; मुसलमानी राज्यकत्यांनी दाखविलेल्या मनसबदारांच्या लालूचीकडे दुर्लक्ष करून, शिवाजीच्या राष्ट्रीय कार्यालाच आपण मदत करीत राहावें, अशा प्रवृत्तीचे नरस प्रभु, दादाजी नरस प्रभु, कान्होजो व बाजी सर्जेराव देशमुख, बाजी पासलकर, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, फिरंगोजी नरसाळा, बाजी प्रभु, मुरार बाजी, बाबाजी व यशवंतराव बोवाजी सारखे अनेक एकनिष्ठ जवानमर्द निर्माण झाले; शिवाजीविरुद्ध मुसलमान राज्यकर्त्यांना मदत करणे, ही गोष्ट शिवाजीनें स्थापन केलेल्या राष्ट्राच्या हितास, अत्यंत विघातक आहे, असा विचार तत्कालीन महाराष्ट्रांतील नव्या पिढीतील कित्येक लोकांच्या मनांत येण्यास, व कृतींत उतरण्यास सुरवात झाली; शहाजीच्या काळांत अशा मतांचा प्रवाह जनतेत सुरू झाला नव्हता; त्यामुळे मुसलमानी राज्यकर्त्यांच्या मह वाला आग्दान करणे ही गोष्ट अशक्य कोटीतील होऊन बसली होती; म्हणजे शहाजीच्या राज्य संस्थापनेच्या काळांत, त्याच्या अपयशास सुद्धां, ह्याच राष्ट्रीय विचारांचा आभाव, हेही एक बलवत्तर कारण झाले होतें; इतकेच नाही तर प्रत्यक्ष शिवाजीलाहि मुसलमानी सत्ताप्रमाणेच, मराठे सर- दार मंडळीशींहि झगडून आपल्या स्वराज्याचा पाया स्थिर व भक्कम करावा लागला होता. महाराष्ट्रांत त्या काळी निजामशाही टिकली काय, आदिलशाही राहिली काय, अथवा मोंगली बादशाही झाली काय, तीन्हींहि एकतंत्री शाह्या मराठ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राला सारख्याच पारतंत्र्यांत डांबून ठेव- णान्या होत्या; फार तर यापैकी कोणाची राज्यव्यवस्था अधिक सह्य व सुखकर झाली असती, एवढाच काय तो एक फरकाचा प्रश्न राहिला असता, पण त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय उन्नती होणे शक्य नव्हतें; अशा स्थितींत मुसलमानी अमलाची महाराष्ट्रावरील पकड ढिली पडण्याकरितो, राष्ट्रीय स्वरूपाची चळवळ सुरू करणे, एवढाच एक रामबाण उपाय असल्यामुळे,