पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४७)

कौशल्य ह्या गोष्टी साध्य असल्या तर कार्थेजियन सैन्याला रोमन लोकांच्या श्रेष्ठ प्रतीच्या कवायती पायदळ सैन्याशी झगडून आपल्या ताब्यात असलेले तसेंच ताब्यांत ठेवितां येतें; त्याप्रमाणेच शहाजीनेंडी आपल्या दक्षिणेतील बांधवांच्या असे निदर्शनास आणून दिले की, हिंदु सेनापतीच्या हाता- खालील हिंदु सैन्य, स्थानिक माहिती, व सैन्याच्या जलद हालचाली, यांच्या योगाने दिल्ली अथवा विजापूर येथील निवडक सैन्याबरोबर तोडीस तोड असा सामना देऊं शकते. शिवाय शहाजीस जर खरोखरीच दिल्ली व विजापूर या उभयतांपैकी कोणत्याही एकाच सत्तेश झगडावें लागलें असतें, तर त्यानें बहुघा अहंमदनगरचे राज्य पुन्हां स्थापन केले असतें; व एखादें कळसूत्री बाहुलें तेथील गादीवर स्थापन करून, आपण त्याच्या नांवानें राज्यकारभार चालविला असता; परंतु त्यामुळे मराठ्यांना कितपत सौख्य- लाभ झाला असता, याची शंकाच आहे; कारण ह्या शहाजीच्या राज्यांतहि निजामशाही राज्याच्या परंपरेप्रमाणेच क्रौर्य, विश्वासघात, आणि खून यांची परंपरा चालूच राहिली असती; परंतु शहाजीस स्वराज्य संस्थापनेंत जें अप यश आलें, त्यामुळेच शिवाजीस, एक अगदींच पूर्णपणे नवें, आणि एकंदरीनें विचार केला तर, ज्या राजकीय गुन्ह्यांमुळे, हिंदुस्थानांतील बहुतेक राज्यांच्या इतिहासास कलंक लागलेला आहे, व जे इंग्लंड व स्कॉटलंडच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या काळांतहि अनेक वेळां घडलेले आहेत, अशा राजकीय गुन्ह्यां पासून मुक्त असलेले x असें अपूर्व राज्य स्थापन करितां आलें. " यावरून, शहाजीची योग्यता, शहाजी व शिवाजी यांच्या कार्याची व्याप्ति, व शिवा- जीनें स्थापन केलेल्या स्वराज्याचें श्रेष्ठत्व, ह्रीं स्पष्टपणें निदर्शनास येतात. शहाजीची कर्नाटक प्रांतांतील मांडलिकी राज्याची स्थापना, ही प्रांतिक स्वरूपाची व मर्यादित व्यासांची होती. परंतु मांडलिकी राज्याच्या ध्येयास शिवाजीनें गणिस्थान दिले; त्यामुळे त्याची स्वराज्य स्थापना राष्ट्रीय स्वरूपाची


 x मराठ्यांच्या इतिहासांत, फक्त एकच राजघुरुषाचा खून झालेला असून तो म्हणजे नारायणराव पेशवे याचा, त्याचा काका रघुनाथराव यानें केलेला खून, हा होय.