पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४६)

नांवाजलेले व पराक्रमी मराठे सरदार मुसलमानी राज्यांची सेवा करण्यांत भूषण मानीत होते; त्यामुळे ही सरदार मंडळी शिवाजीस त्याच्या स्वराज्य संस्थापनेच्या कार्यात साह्यभूत तर झाली नाहींच, पण उलट शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेस प्रारंभापासून त्यांनी सारखा विरोधच केला; जेधे, बांदल, वगैरे नांवाजलेली थोडीशी अपवादादाखलची मंडळी सोडून दिली तर शिवाजीला प्रारंभी अनुकूळ झालेली मंडळी पूर्व प्रसिद्ध व विशेष नांवाज- लेली नसून, त्यांना राजकीय क्षेत्रांत म्हणण्यासारखे महत्वहि नव्हते; अर्थात या मंडळींच्या मदतीनें, व लोकसंग्रह करीत राहून त्यांच्या साह्यानें, शिवा- जीनें अचाट अद्वितीय पराक्रम करून जें स्वराज्य संस्थापनेचे कार्य सिद्धीस नेलें, त्या यशाचा शहाजीस वांटेकरी करता येईल, असे म्हणतां येत नाहीं. परंतु त्यामुळे शहाजीनें बजाविलेली श्रेष्ठ व असामान्य कामगिरी कमी दर्जाची होती, असे म्हणणेहि योग्य होणार नाहीं; शिवाय शहाजीनें केलेली अनेक पराक्रमाच, साहसाचों व शौर्याची कृत्यें शिवाजीस त्याच्या भाव राज्य संस्थापनेच्या कार्यात मार्गदर्शक झालेली असल्यामुळे, परंपरेनें का होईना; पण शहाजीची शिवाजीस त्याच्या उद्दिष्ट कार्यात मदत झाली नाहीं, असें म्हणणेहि वस्तुस्थितीस धरून होणार नाही. म्हणजे शिवाजीच्या स्वराज्य संस्थापनेत त्याला शहाजीची अप्रत्यक्षपणे मदत झाली, ही गोष्ट निर्विवाद आहे.

 शहाजी व शिवाजी यांची तुलना करितांना एके ठिकाण ( A History of the Maratha People Part I Page 207- 208 पहा. ) असे लिहिले आहे की, “ काथेज येथील प्रसिद्ध योद्धा ह्या- मिलकार याचा मुलगा हॉनिबाल हा त्याच्याहून अधिक कर्तृत्ववान निपज- स्यामुळे त्याच्या किर्ती वृक्षाखालीं ह्यामिलकाराची कीर्ति पार झांकली गेली, त्याप्रमाणेंच शिवाज्जीच्या कीर्तिवृक्षाखाली शहाजची कीर्तिही पार झांकली गेली. तथापि ह्यॉमिलकार व शहाजी यांनी आपल्या कर्तृत्वाने जे कार्य घडवून आणिलें, त्यामुळेच हॉनीबाल व शिवाजी या उभयतांना त्यांनी भावी काळांत जी मद्दत्कृत्यें केलीं, ती करणे साध्य झाले. ह्याँमिलकार यानें आपल्या सिसिलीमधील किल्लघांतून आपल्या देशबांधवांची अशी खात्री करून दिली की, उत्तम सेनापति, आणि सैन्याच्या हालचाली करण्याचें