पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४५)


परभारेंच मुक्तता होईल अशा दोन्हींपैकी कोणत्याही दृष्टीने फायदेशीर असलेल्या हेतूनें अदिलशाहानें शहाजीस कर्नाटक प्रांती पाठविले होते; परंतु त्यामुळे अदिलशाहाचा पहिला उद्देश सिद्धोस गेला नाहीं; उलट शहाजीनें कर्नाटक प्रांतों जाऊन आपल्या सैन्यबलानें, अदिलशाहाच्या सर्व प्रतिस्प ध्यांचा पाडाव करून, आपल्या लष्करी बळाची तीव्रता व सामर्थ्य, हीं अदिलशाहाच्या नजरेस आणून दिली. त्यामुळे जरी बाह्यात्कारी अदिलशहाने शहाजीस दाबांत ठेवण्याचा आव आणिला, तरी त्याच्या अंतर्यामी शहाजी संबंधाची भीति कायम राहिली; शहाजी जितका लांब राहील तितका बरा असे त्यास वाटू लागले; पण तो स्वतंत्र होऊं नये, म्हणूनही तो त्याच्या हालचालीचें बारकाईनें निरिक्षण करीत राहिला; आपल्या श्रेष्ठ अधिकाराचें बेगडी प्रदर्शन करण्याकरितां त्याने ( अली अदिलशाहा यानें ) शहाजीस बंकापूर येथे कैद केले; पण शहाजीचें लष्करी बळ त्याच्या डोळ्यापुढे दिसत अस त्यामुळे त्यानें फक्त दोनच दिवसानंतर शहाजीची प्रतिबंधांतून मुक्तता केली, व कित्येक दिवसपर्यंत त्याचा अधिकार काढून घेतल्याची बतावणी करून नंतर त्याने त्यास पुन्हां पूर्वीप्रमाणे अधिकारापन केले. अदिल- शाहाची व त्याच्या राज्याची ही दुर्बलता शहाजी ओळखून होता; तत्का- लीन राजकीय परिस्थितीचे त्यानें पूर्ण आकलन केले होतें; आपल्या लष्करी बळाच्या जोरावर तो अदिलशाहास प्रसंगी भिववीत होता; त्यामुळे; त्यानें ह्या गोष्टींचा शक्य तितका पूर्णपणें फायदा घेण्याचा निश्चय केला; प्रयत्न आरंभिला; व स्वतःच्या कर्तबगारीवर कर्नाटकमध्ये एक मांडलीकी को होईना, मराठ्यांचे राज्य निर्माण केले, ही गोष्ट शहाजीचें असामान्य कर्तृत्व, असाधारण योग्यता, व अलौकिक कार्यक्षमता, यांची निदर्शक असल्याचे उघड उवडच सिद्ध होत आहे.

 शिवाजीनें भावो काळांत अंगावर घेतलेल्या स्वराज्य संस्थापनेच्या कार्यात त्याला शहाजीची पुणे प्रांतांतील जहागीर, सैन्य, संपत्ति, मुत्सद्दी मंडळ इतक्या देणग्या शहाजीकडून मिळाल्या; व या सर्व साधनांचा आणि शहा- जीच्या नांव लौकिकाचा, आपणांस जितका फायद्याचा करून घेतां येणे शक्य आहे, तितका सर्व शिवाजीनें करून घेतला; तथापि शहाजीच्या वेळेपर्यंत