पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४४)

इ० सन १६५७-५८ मध्यें, अवरंगझेबाच्या तडाक्यांतून आदिलशाही जगली; तथापि एकंदरीनें पाहतां, आदिलशाहाच्या उद्दिष्ट हेतूच्या मानाने अगदीच निराळा परिणाम घडून आला. शहाजीचें विजयोप्तादक सैन्य आपल्या ताब्यांत ठेवण्याची आदिलशाहाची कुंवत नव्हती; शहाजीसारख्या रणविद्या- विशारद सेनानायकाला आपल्या दाबांत ठेवण्याइतका तो कर्तृत्ववान नव्हता; शहाजीच्या सशस्त्र व सज्ज सैन्याचे ज्वलत् घटकावय आपल्या नियंत्रणा- खाली दाबून ठेवण्याला आवश्यक असणारे, त्याहून अधिक जबरदस्त व यथातथ्य लष्करी बळ, त्याच्या संग्रही नव्हतें; "शहाजीचे लष्करी बळ " हैं आदिलशाहाच्या हातांतील एक खात्रीचे सर्वदाहक अस्त्र होतें; पण आदिलशाहीतील राजकीय तराजूच्या एका तागडींतील शहाजीच्या प्रचंड लष्करी बळाचा भार समतोल ठेवण्याकरितां प्रतितोलाचें असे कोणतेही वजन दुसऱ्या तागडीत टाकण्यास आदिलशाहाच्या संग्रही नव्हते; त्यामुळे शहा- जीच्या लष्करी बळास डवचळण्याचा आपणाकडून थोडासाहि प्रमाद घडला, तर तेंच अस्त्र अनावर होऊन, राजकीय वातावरणांत एकदम उलथापालथ केल्याशिवाय राहणार नाही, अशी आदिलशाहास भीति होती; ते बळ अनियंत्रित होऊं नये, म्हणून तो अतीशय खबरदारी घेत होता; शहाजीस राजधानीत आपणाजवळ ठेवून घेण्यास उत्सुक नव्हता; शहाजीस कोठें तरी लांबवर अडकावून टाकून आपला जीव, व राज्य सुरक्षित करावें, असा अदिलशाद्दाचा हेतु होता; आणि त्यामुळेच त्यानें शहाजीस, कर्नाटक- प्रांत अदिलशाही हुकमतीखाली आणून तिकडे शांतता प्रस्थापित करण्याची कामगिरी सोपविली होती. यांत दोन्हीं दृष्टीनेंदि अदिलशाहाचा फायदाच होता. अदिलशाहानें कित्येक वर्षे, अनेक मुसलमान सरदार पाठवून कर्नाटक प्रांत हस्तगत करून घेण्याचे प्रयत्न केले होते; परंतु ते सर्व निष्फळच झालेले होते. त्यामुळे शहाजीस कर्नाटक प्रांत पाठवावे, म्हणजे एक तर तो कर्नाटकप्रांत जिंकून तेथें आदिलशाही सत्ता स्थापन करील, व त्यामुळे आपल्या राज्याची व वसुलीची वृद्धी होईल; अथवा कर्नाटकमधील शिरजोर, श्रीमंत व सशस्त्र राज्यकर्ते, व पाळेगार, यांच्या जात्याच्या दोन तळीत, शहा- जीची लष्करी शक्ति भरडली जाऊन, शहाजीच्या भीतीपासून आपली