पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४३ )

पण शहाजीस मोकळे ठेवणेंदि तितकेंच घोक्याचे असल्यामुळे त्याने त्याला मोकळेहि सोडले नाही. आपल्या पंजाखालून निसटून जाऊं शकणाऱ्या शहा- जोला, आपल्या पंजाखाली पूर्णपणे दाबून ठेवण्याचा अंतस्थ डाव शहाजहान याच्या मनांत असल्यामुळे, आदिलशाहीत नौकरींत राहण्याची त्यास पर वानगी देऊन, म्हणजे अप्रत्यक्षपणे आदिलशाहास- आपल्या मांडलीक अस- लेल्या विजापूर दरबारास - शहाजीस नौकरांत ठेवून घेण्याविषयीं सुचवून, शहाजीच्या प्रचंड लष्करी सत्तेस त्यानें परभारें दावांत ठेवण्याचे राजकारण साधले. त्यांतहि पुन्हां, शहाजहान याचा दुसराहि एक राजकारणाचा डाव असण्याचा संभव आहे. तो असा कीं, आदिलशाहाने शहाजीची प्रचंड लष्करी शक्ती दाबत ठेविली तर भावी काळांत आदिलशाही खातांना एका प्रबळ हिंदु लष्करी सत्तेचा होणारा अडथळा परभारें व त्रासाशिवाय नाहींसा झाला असे होईल; आणि शहाजीच्या लष्करी बळानें आदिलशाहास निःसत्व केले तर थोड्याशा सायासाने शहाजीचें लष्करी बळ चिरडून टाकून, आदिलशाही खाऊन टाकण्याच्या प्रयत्नांत होणारा पुष्कळच त्रास, शहा- जीच्या करणीनें वांचून सहजासहजी आदिलशाही राज्यलक्ष्मी आपल्या घशा खाली उतरवितां येईल; आदिलशाहा व शहाजी या उभयतांचे लष्करी बळ एकवटलेले असतांना आदिलशाहीचा बडा घांस शहाजहानला आपल्या घशाखाली उतरवितां येणे फारच कठीण होतें; आणि हा घांस फोडून खाव- याचा तर आदिलशहा किंवा शहाजी या उभयतांना परस्पराविरुद्ध लढवून, अथवा त्यांना किंवा त्यांपैकी एकाला निःसत्व करवून, नंतरच तो खातां व पचविता येणे शक्य होतें; व याच दूरदृष्टीच्या धोरणानें शहाजहान यानें शहाजीस आदिलशाहाच्या पदरी नौकरीस राहण्याची परवानगी दिली होती. उलटपक्षी, यावेळी आदिलशाही राज्य प्रबळ स्थितीत नव्हतें; व स्वतः आदिलशाहा निधडया छातोचा नसून दुर्बल प्रवृत्तीचा राज्यकर्ता होता; त्यामुळे शहाजीचे लष्करी बळ आदिलशाही राज्याची सत्ता वृद्धिंगत कर ण्यास, व मोंगल बादशाहीच्या अतिक्रमणास आळा घालून आदिलशाही जगविण्यास, अतीशय उनयोगाचें होईल, या हेतूनें त्यानें शहाजीस आपल्या पदरी आश्रय दिला; त्यामुळे आदिलशाही राज्याचा बराच फायदा होऊन,