पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४२)

उत्तम कारीगार हत्यार कोठून पैदा होतें, व कोण आणून देतो, ह्याचा अनु- भव जुन्नरच्या घाटाखालील कोंकणांत शहाजीस आलेला होता; म्हणून दीव, दमण, गोवा, वसई, सुरत, तालेचरी वगैरे ठिकाणच्या युरोपियन लोकांकडून कारोगार हत्यारें पैदा करून निजामशाही, आदिलशाही, व मोंगलाई सैन्या- हून शहाजीनें आपले सैन्य अर्धीक कर्तबगार ठेविलें होतें; सैन्य व हत्यार यांच्यावरील त्याचा अढळ विश्वास अत्यंत आपत्तीच्या प्रसंगीही कायम होता या जय्यत सैन्याच्या जोरावर कधीं आपल्या बालेष्ठ प्रतिस्पर्ध्याशों झगडून तर कर्धी बगल देऊन, तो उत्तरोत्तर आपलें वर्चस्व वृद्धिंगत करीत चालला होता; आणि याच शक्ती व साधनाच्या जोरावर आपण शेवटी आपल्या अंगिकृत कार्यात यशस्वी होऊंच होऊं, अशी त्याची पूर्ण खात्री होती.

 शहाजी मोंगल बादशाहीशी झगडल्यानंतरहि त्याला नामशेष करण्याचा नुसता प्रयत्न करण्याचीसुद्धां शहाजहान याची छाती झाली नाही; याचें कारण शहाजीचें दांडगें सैन्यबळ हे होतें; इ० सन १६३६ मधील निजाम- शाहीविरुद्धची मोहीम पावसाळ्याच्या आंत खलास करण्याचे शहाजहानचें सर्व अंदाज शहाजीनें हुकविले, आणि शहाजी म्हणेल त्या अटीवर मोहीम कशी तरी शहाजहान याला संपवावी लागली, हा शहाजीच्या करामतीचा अनुभव शहाजहान यांस मिळालेला होता; शहाजांस दमांत उखडून त्याचें लष्करी बळ आदिलशाहा व शहाजहान यांनी खच्ची केले, ते शहाजीस पुन्हां निजामशाही उभी करता येणार नाही, या व्याप्तोपर्यंतच फार तर खच्ची झाले होते; त्यामुळे शहाजीची लष्करी सत्ता आदिलशाहास व थोड्या फार प्रमाणांत शहाजहान यांस भीतिदायक वाटणारा अशीच कायम होती; म्हणजे शहाजीची ही दांडग्या सैन्यबलानें विभूषित असलेली मनसबदारी ही मोठीच तोलदार होती; तिला कह्यांत ठेवणे मोठेंच जिवावरचें, नाजुक व संकटाचें काम होतें; सुखविली तर तो आयतीच अलगज प्रेमानें उरावर बसते, आणि दुखविली तर रागावून प्रांण घेते, " अशी दोन्हीकडून ही भांतिप्रद असणारी ही मनसबदारी होती; म्हणून इ० सन १६३६ नंतर शहाजहान शहाजीच्या वाटेस कधीहि गेला नाहीं, व निजामशाही नष्ट झाल्या- नंतर त्याने शहाजीचें है प्राणसंकट आपल्या गळ्यांतहि बांधून घेतलें नाहीं;