पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४१ )

वागण्याची एकाचीहि छाती झाली नाहीं, ही एकच गोष्टसुद्धां शहाजीचा अलौकिक पराक्रम व अचाट घाडस याची निदर्शक असून त्यावरूसुद्धां शहाजी हा एक अलौकिक पुरुष होऊन गेला आणि स्वराज्य स्थापनेच्या मर्यादित कल्पना, शहाजीच्या वेळींच अत्यंत अंधुकपर्णे, व अत्यल्पांशाने का होईना, पण उदय पावण्यास सुरवात झाली, असे म्हणणे वस्तुस्थितीस धरून होईल, हैं उघड आहे.

 शहाजीची निजामशाहीतून हकालपट्टी झाल्यावरहि आणि शहाजी हा विजापूरकर आदिलशहा व प्रत्यक्ष मोंगल बादशाहा यांच्याशीं झगडला असतांनाहि, त्याला विजापूरकरांचा आश्रय कां मिळाला, व त्याला कर्नाट- कांत एक मांडलिकी राज्य की स्थापन करतां आलें, यांच्या कारणांचाही या ठिकाण विचार केला पाहिजे; व तो, तत्कालीन इतर मराठे मनसबदार व शहाजी यांच्या राजकीय स्थितीमध्ये कोणता महत्वाचा फरक होता है लक्षांत घेऊन त्या संबंधी विवेचन केले पाहिजे, तत्कालीन इतर मराठे मन- सबदार, हे त्यावेळी सैन्य बाळगून होते; पण फार तर पांच ते दहा पंधरा हजार सैन्याचेच ते मालक होते; व त्यांची हत्यारें व सरंजामहि जय्यत स्थितीत नव्हता; अर्थात अशा तुटपुंज्या सैन्याच्या, व सैन्य सामुग्रीच्या बळा वर मनसबदारांना कोणत्याहि एकट्याच सुद्धां मुसलमानी शाही विरुद्ध राज- रोस हातांत शस्त्र घेऊन उमें राहणे केव्हांहि शक्य नव्हते; उलटपक्षी शहाजी हा साठ सत्तर हजार प्याद्यांचा, व घोड्यांचा मालक होता; अत्यंत बलिष्ठ मनसबदार होता; शहाजीचीही मनसबदारी एकाद्य शाला शोभेल अशीच मोठी तोलदार, ताकदार व तयार फोज बाळगणारी अशी अती- शयच वरचढ होती; हैं सैन्य हाच शहाजीच्या उत्कर्षाचा मुख्य आधार होता हीच फौज शहाजीस त्याच्या आपत्कालीं पाठीराखी होती; आणि याच सैन्याच्या जोरावर, स्वतःचा शक्य तितका उत्कर्ष करून घेण्याचा शहाजींचा इरादा व निश्चय होता. शहाजीनें ह्या आपल्या सैन्याला अत्यंत प्रेमानें वाग वून त्याच्या ठाय आपलेपणा उत्पन्न केला होता; व शहाजीच्या ममताळू वागणुकीमुळे हे त्याचें सैन्य त्याच्याकरितां प्राण देण्यासहि तयार होतें.