पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४० )

कोणालाही खाविंद म्हणण्याची इच्छा नव्हती; व त्यानें कर्धी कोणास तो श्रेष्ठत्वाचा मान दिलाही नाही. शहाजी अखेरपर्यंत परतंत्र राहिला; शिवाजी प्रारंभापासूनच स्वतंत्र राहिला; त्या सर्व गोष्टी, हेच शहाजी व शिवाजी यांच्या चरित्रांमधील वैशिष्य आहे, आणि त्यामुळेच स्वराज्यसंस्थापनेचे श्रेय, शिवाजीच्या बरोबरीनें शहाजीस देता येणार नाही, हे उघड आहे.

 तथापि शहाजीनें महाराष्ट्राच्या इतिहासांत बजावलेली कामगिरी शिवाजी- च्या खालोखाल अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे, यांत कांहीही संशय नाहीं. तत्कालीन सर्व मराठा सरदार मंडळींत राष्ट्रभावना नव्हती, अथवा सर्वच मराठे सरदार अधम संस्कृतीचे होते, असें म्हणता येणार नाहीं. कांहीत नसली तरी कांहींत राष्ट्रभावना होती; व उच्च संस्कृतीहि होती; पण स्वराज्या करतां आपल्या जहागीरांवर, इतकेच नाहीं तर सर्वस्वावर पाणी सोडणारा प्रचंड स्वार्थत्याग त्यांच्या ठायीं नव्हता; आणि दक्षिणेतील, व हिंदुस्थानांतील प्रबळ मुसलमानी सत्ता आपणांस उलथून पाडतां येईल, ही गोष्ट त्यांना अशक्य वाटत होती; म्हणूनच त्यांनी तसा उद्योग अंगावर घेण्याचे धाडस केलें नाहीं. परंतु तोच उद्योग शहाजीनें आपल्या अंगावर घेतला व तो पुष्कळच प्रमाणांत सिद्धीस नेला, हैच इतर मराठे सरदार व शहाजी यांच्या मधील महत्वाचें वैशिष्य आहे. आदिलशाहाची चाकरी करून स्वतःला मनसबदारी मिळवून घेऊन, फक्त स्वतःचा फायदा करून घेणे, इतकीच निव्वळ आकुंचित वृत्ती शहाजीची नव्हती. शिवाजीच्यावेळी राजकीय परिस्थिती बदलली; काळ बदलला, ही गोष्ट निराळी; पण शहाजीनेंही मर्यादित वर्चस्व- क्षेत्रांतील आपल्या मांडलीकी स्वदेशांत स्वधर्म, स्वभाषा, व स्वजन, चें पालन लालन व रक्षण केले, त्या आदरणीय गोष्टी, शहाजी आकुंचित वत्तीचा असता तर त्याच्या हातून कधींच झाल्या नसत्या. शहाजीच्या काळांतच इतर अनेक मराठे सरदार शहाजी सारखेच शूर व पराक्रमी असूनहि ते मुसलमानी राज्यांत वरिष्ठ दर्जाची मनसबदारी मिळविण्यांत व ती कायम ठेवण्याकरितां राज्यकर्त्याशी एकनिष्ठ राहण्यांत भूषण व आपल्या आयुष्याचे इतिकर्तव्य मानीत; पण शहाजीप्रमाणे मुसलमान राज्यकर्त्याविरुद्ध राजरोस हातांत शस्त्र घेऊन उभे राहण्याचे त्यापैकी एकानेही मनांत आणिलें नाहीं, अथवा तसे