पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२९ )

सुरक्षित रहावें, व सुरळीत चालावे, म्हणून खटपट करितो. इतकेच नाहीतर स्या राज्ययंत्राची गति बंद करूं पाहणाऱ्याा, अथवा त्या ऐवज दुसरें राज्य- यंत्र स्थापित करूं पाहणाऱ्या चळवळ्या स्वराज्यवाद्यास, तो स्वकीय असू नही त्यास शत्रू मानून त्याचा प्रतिकार व नाश करण्यास मनोभावें सिद्ध होतो. हाच प्रकार शहाजी व इतर मराठे सरदार यांच्या बाबतीत घडून आला. याच कारणामुळे मोरे, निंबाळकर, घोरपडे, सांवत, मोहिते वगैरे मराठा सरदार मंडळी शहाजी व शिवाजी या उभयतांच्या उद्योगास अनकूल न होतां विरुद्ध गेली; व त्यांनी त्या उभयतांचे प्रचंड उद्योग हाणून पाडण्यास मनापासून मोठे अविश्रांत परिश्रम घेतले.
 शहाजीची मनसबदारी एखाद्या राज्यकर्त्याला तोलेल अशा तोलाची होती; व त्यानें स्वराज्य स्थापनेचा प्रचंड उद्योगही कांहीं प्रमाणांत सिद्धीस नेला होता. बाल राजा मूर्तुचा निजामशहा याला, तख्तावर घेऊन बसण्याचा परिपाठ पाडून जित व जेते या उभयतो दरबारी मंडळींच्या नजरेस हिंदू राजा तख्तावर बसलेला पाहण्याचा नवा संप्रदाय त्याने सुरू केला होता; आणि जेत्या व राज्यकर्त्या मंडळीत त्यांच्याहूनही अधीक सहकारी वैभवाची शेवटची पायरी त्याने स्वपराक्रमानें प्राप्त करून घेतली होती; म्हणजे जित समाजांतील कर्त्या व्यक्तीस स्वप्नांतसुद्धां लाभणे कठिण, असें अपवादात्मक असामान्य, अलौकिक, व कल्पनातित वैभव शहाजीस प्राप्त झाले होतें. अर्थात् या काळांत, शहाजीच्या मानानें पुष्कळच कमी वैभवांत असलेल्या, व शहाजीसारख्या राज्यवैभव उपभोगीत असलेल्या मराठा सरदार मंडळींची मनःस्थिती कशा प्रकारची होती, यांचे तुलनात्मक विवेचन केलें, म्हणजे " शहाजी हा अलौकिक पुरुष होऊन गेला " असेंच निदर्शनास येतें. मुसल मानी राज्यकर्त्या बरोबरील सहकारितेंत जन्म घालवून मिळालेले वैभव प्राप्त करून घेतलेले असल्यामुळे, ही सरदार मंडळी सुखाला चटावलेली होती; सहकारितेचें वैभव त्यांच्या सुखास कारणीभूत झालेले असल्यामुळे, सहकारिता हीच आपल्या सुखाची, कर्तृत्वाची, यशाची व उत्कर्षाची गुरुकिल्ली आहे, असा त्यांचा दृढ समज होता; व ज्या राज्यकर्त्याशी केलेल्या सहकारितेमुळेंच, आपणांस हे वैभव प्राप्त झाले, त्या राज्यकत्याची भिकेची हंडी शिंक्यावर न